spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कोळसा चोरी करून नेताना ओमनी कार पकडली

– आरोपीस अटक, कोळसा आणि वाहन असा एकुण २,१०,६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त. 

कन्हान :- वेकोलि सिंगोरी खुली कोळसा खदान येथुन मारूती ओमनी वाहनात दगडी कोळसा चोरून नेताना वेकोलि सिंगोरी सुरक्षारक्षकाना पेट्रोलिंग दरम्यान दिसल्याने त्याचा पाठवाग करून कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत नांदगाव शेत शिवारात आरोपीस पकडुन कन्हान पोलीसाना घटनास्थळी बोलावुन मारूती ओमनी वाहनासह कोळसा पकडुन कन्हान पोलीसानी आरोपीस अटक करून दोन लाख दहा हजार सहाशे रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.

शुक्रवार (दि.३०) जानेवारी २०२६ ला सकाळी ९ वाजता दरम्यान वेकोलि सिंगोरी खुली कोळसा खदान प्रभारी सुरक्षा अधिकारी संजय सेलुकर हे सुरक्षारक्षक रविकांत रामदास कंडे आणि प्रविण श्रीराम पिम्पल शेंडे यांचे सोबत वेकोलि सिंगोरी परिसरात पेट्रोलींग करित असताना सिंगोरी खुली कोळसा खदान मधुन कोळसा चोरी करून मारोती ओमनी चारचाकी वाहन क्र.एमएच ४० ए ०१०३ मध्ये घेवुन जातांनी दिसल्याने वाहन चालकास हात दाखवुन थांबण्याचा ईशारा केला असता तो न थांबता पळुन गेल्याने त्याचा पाटलाग करून एच.एन.आर पेट्रोल पंप जवळ नांदगाव, शेत शिवारात ओमनी चारचाकी वाहन पकडुन कन्हान पोलीसाना बोलाविल्याने पो.उप.नि प्रविण हारगुडे सह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचुन चालकाला नाव विचारले असता आनंद अशोक मेश्राम वय २९ वर्षे, रा. मेंहदी, ता. पारशिवनी, जि. नागपुर असे सांगितले. दगडी कोळसा विकत घेतल्याचे बिल व दगडी कोळसा वाहतुक करण्याचा परवाना बाबत विचारणा केली तर त्याचे जवळ कोणताही परवाना नव्हता. आरोपीने सदर दगडी कोळसा वेकोलि सिंगोरी येथिल ओव्हर बर्डन डॅम्पींग यार्ड मधुन चोरी करून आणल्याचे सांगितल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी वेकोलि सिंगोरी खुली कोळसा खदान प्रभारी सुरक्षा अधिकारी संजय मुरलीधर सेलुकर वय ५८ वर्ष यांचे तक्रारीवरून पंचा समक्ष घटनास्थळावरून मारूती ओमनी चारचाकी वाहन किंमत २,००,००० रूपये ज्यात १०६० किलो दगडी कोळसा किंमत १०,६०० रूपये असा एकुण २,१०, ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर प्रकरणी आरोपी विरूष्ट्र पोलीस स्टेशन कन्हान येथे कलम ३०३ (२) भान्यासं प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी आंनद अशोक मेश्राम ला अटक करण्यात आली असुन पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.

Popular Articles