spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सी.जे.पटेल महाविद्यालयात रेशीम उद्योगावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

तिरोडा :- रेशीम उद्योजकतेद्वारे ग्रामीण विकासास चालना देण्याच्या उद्देशाने सी. जे. पटेल महाविद्यालयात दिनांक 25 सप्टेंबर गुरुवार रोजी “रेशीम उद्योजकता – ग्रामीण विकासाचा मार्ग” ह्या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजयभरत शर्मा यांनी भूषविले, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून हेमंत लाडगांवकर सहाय्यक संचालक, प्रादेशिक रेशीम संचालनालय महा. राज्य व चंद्रपाल वासनिक, जिल्हा रेशीम विकास अधिकारी, अर्जुनी मोरगाव यांची उपस्थिती लाभली.

कार्यशाळेत महाविद्यालयातील विद्यार्थी व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रमुख मार्गदर्शकांनी रेशीम उद्योगाचे तांत्रिक व आर्थिक पैलू, प्रशिक्षण व बाजारपेठेतील संधी यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

प्राचार्य डॉ. अजयभरत शर्मा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ग्रामीण विकासासाठी स्थानिक संसाधनांचा उपयोग करून स्वयंरोजगाराची संधी निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकतेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले.

हेमंत लाडगांवकर यांनी रेशीम शेतीची व्यावसायिक शक्यता, किड पालन, तंत्रज्ञान व सरकारी योजनांची माहिती दिली. चंद्रपाल वासनिक यांनी शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली व प्रत्यक्ष यशोगाथा सांगत सहभागींच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला.

कार्यशाळेच्या अखेरीस उपस्थितांनी प्रश्नोत्तर सत्रात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संयोजन व आयोजन महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. राजकुमार भोंडे ह्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. महेश मेश्राम यांनी केले, प्रस्तावना प्रा. अक्षय चव्हाण ह्यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. रवी चौधरी यांनी केले.

Popular Articles