spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नवरात्रीत वनदेवीची पूजा, नेफडो व वनविभागातर्फे हरित संदेशाचा अनोखा उपक्रम

सुरज बंडीवार, पांढरकवडा :- नवरात्रीच्या पावन पर्वावर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय पांढरकवडा येथे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था व वन विभागातर्फे वनदेवी पूजनाचा अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृतीने नेहमीच निसर्गाला देवत्व दिलं आहे. झाडं, पाणी, पर्वत, माती हे सर्व आपल्यासाठी पूजनीय आहे. आजही देवाच्या नावाने राखलेले वन म्हणजे देवराई जंगलाचा एक भाग पवित्र मानला जातो. या ठिकाणी वनदेवीची पूजा केली जाते. देवीच्या नावाने राखून ठेवले असल्याची श्रध्दा असल्यामुळे देवीचा कोप होईल या भीतीने जंगल क्षेत्रात कोणी जंगलतोड शिकार करीत नाही व वनस्पती व प्राणी यांचे संरक्षण होते. नवरात्रीत देवीची खरी आराधना करणे म्हणजे निसर्गाचे रक्षण करणे जैवविविधतेचे संवर्धन करणे होय. या उपक्रमाच्या माध्यमातून श्रध्दा, निसर्ग प्रेमाचा हरित संदेश देण्यात आला. या वेळी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा डॉ. प्रिती तोटावार, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. एम. दुबे, वनपरिक्षेत्र अधिकारी एस. जी. पाटील वनरक्षक पदावर कार्यरत असलेल्या वैशाली तोडसाम, रेणुका सोनी, अर्चना कुडमेथे, शीतल करपते, शुभांगी उदकांडे, एम. आर .येन्नावार, निखिल आगरकर, ओम देवतळे, वनपाल मिलमिले व वन्यप्रेमी उपस्थित होते.

Popular Articles