spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ऑरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लबच्या ३०व्या छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन रविवारी

नागपूर :- ऑरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लब, नागपूरच्या वतीने क्लबच्या ३०व्या वर्धापनदिनानिमित्त तसेच जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून ३० वी वार्षिक छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पत्रकार परिषदेत क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, विठोबा इंडस्ट्रीज, बंधन डिजिटल लॅब, अल्ताफ एच. वली तसेच इतर सहकाऱ्यांच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेत ‘वाइल्डलाइफ अँड नेचर’, ‘ट्रॅव्हल, स्ट्रीट अँड इव्हेंट’ आणि ‘मोबाईल फोटोग्राफी’ अशा तीन विषयांचा समावेश आहे. विजेत्यांना एकूण १ लाख ३५ हजार रुपयांपर्यंतची पारितोषिके देण्यात येणार आहेत. छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन रविवार, १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र सभागृह, सिव्हिल लाइन्स, नागपूर येथे होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार ॲड. अभिजीत वंजारी उपस्थित राहणार असून, विठोबा इंडस्ट्रीजचे संचालक कार्तिक शेंडे व अल्ताफभाई हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. प्रदर्शनाचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ बुधवार, १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विकास ठाकरे उपस्थित राहतील. माजी कुलगुरू शरद निंबाळकर व बंधन लॅबचे अबी बानी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. १६ ते १९ ऑगस्ट दरम्यान सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. तसेच विविध विषयांवर तज्ज्ञांची मार्गदर्शनपर कार्यशाळाही आयोजित करण्यात आली आहे. क्लबचे अध्यक्ष महेश काळबांडे, सचिव नरेश नेरकर, कोषाध्यक्ष नितेश बाहे, संयोजक डॉ. मातरिश्व व्यास तसेच सहसंयोजक राजन गुप्ता, चेतन जोशी व पंकज गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम होत आहे. छायाचित्रप्रेमींनी प्रदर्शनास आवर्जून भेट देऊन स्पर्धकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले. असे पत्रकार परिषदेत अध्यक्ष महेश काळबांडे यांनी पत्रकारांना माहिती दिली. यावेळी उपस्थित महेश काळबांडे, नरेश नेरकर, चेतन जोशी, गजानन रानडे, राजन गुप्ता आणि अभी बानी यांची उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमासाठी नाना नाईक, रमाकांत झाडे, प्रदीप निकम, दिनेश मेहर हे सर्व परिश्रम घेत आहे.

Popular Articles