spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

तुमसर पोलिसांची मोठी कारवाई; नवरगाव शिवारात २ लाखांचा सडवा मोहापास जप्त आरोपी फरार; एकूण २ लाख ३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधि,भंडारा तुमसर :- तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नवरगाव शिवारात पोलिसांनी अवैध दारू निर्मिती अड्ड्यावर छापा टाकून तब्बल २ लाख ३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवरगाव शिवारात मोठ्या प्रमाणावर अवैध रित्या गावठी दारू तयार करण्यासाठी सडवा मोहापास साठवून ठेवला असल्याची गुप्त माहिती पोलीस शिपाई रंभाड यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मौजा नवरगाव शिवारात छापा टाकला. पोलिसांना पाहताच आरोपी लक्ष्मण मदन गुर्वे (वय ४३ वर्षे, रा. नवरगाव) हा घटनास्थळावरून पळून गेला.

पोलिसांनी घटनास्थळाची पंचासमक्ष पाहणी केली असता, ४० प्लास्टिक पोत्यांमध्ये एकूण १००० किलो सडवा मोहापास आढळून आला. याची किंमत प्रति किलो २०० रुपये प्रमाणे २ लाख रुपये आहे. याव्यतिरिक्त घटनास्थळावरून २,१०० रुपये किमतीची ७ मण जळाऊ लाकडे आणि १,४०० रुपये किमतीचे २ जुने लोखंडी ड्रम, असा एकूण २,०३,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी आरोपी लक्ष्मण गुर्वे याच्याविरुद्ध तुमसर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ९०३/२०२६, कलम ६५ (फ) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची यशस्वी कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विसापुरे, पोलीस निरीक्षक बारसे, पोलीस निरीक्षक आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई बिसने आणि रंभाड यांनी केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.