Home Latest News निवडणुकीनंतरचे आत्मचिंतन..!

निवडणुकीनंतरचे आत्मचिंतन..!

0

<p>निवडणुकांनंतर काही पक्षांना आत्मचिंतन करावे लागते&period; इलाजच नसतो&period; जिंकणारे पक्ष साधारणत&colon; हरलेल्या पार्टीला आत्मचिंतन करायला सांगतात&period; जे जिंकून येतात&comma; त्यांना या प्रकाराची फारशी गरज नसते&period; आणि जे हरतात त्यांना या प्रकाराची सवय नसते&period; यामुळे लोकशाहीचे फार्फार नुकसान होते&period; राजकीय पक्षांचे आत्मचिंतन ही निव्वळ कविकल्पना आहे&comma; असे कुणाला वाटेल&period; पण तसे नाही&period; काही पक्ष खरेच असे करतात&comma; याचा अनुभव आम्हाला नुकताच आला&period; नुकत्याच महापालिकेच्या निवडणुका होऊन गेल्या&period; अनेक पक्षांवर आत्मचिंतन करण्याची पाळी आली&period; भारतीय कमळ पार्टी हा एकमेव सत्ताधारी पक्ष आहे की जो जिंकल्यावरही आत्मचिंतन करण्याचे सोडत नाही&period; हे या पक्षाचे वैशिष्ट्यच आहे&period; बघावे तेव्हा आत्मचिंतन करीत असतात&period; या पक्षासह अनेक पक्षाच्या नेत्यांना आम्ही आत्मचिंतनाचे काय केले&quest; हा प्रश्न विचारला&period; प्रत्येक पक्षाच्या वतीने आम्हाला सविस्तर चिंतन सांगितले&period; यामुळे आपली लोकशाही कमालीची बळकट&comma; प्रगल्भ आणि परिपक्व होत चाललेली आहे&comma; हे आम्हाला कळून चुकले&period; या विविधरंगी आत्मचिंतनाचे अंश येथे देत आहो&period; जागेअभावी एकेका परिच्छेदात आत्मचिंतन संपवले&comma; असा आरोप आमचेवर होऊ शकतो&period; पण राजकीय पक्षांनी एवढेच आत्मचिंतन केले&comma; त्याला आम्ही तरी काय करणार&quest; सविस्तर देत आहे &colon;<&sol;p>&NewLine;<p><strong>कमळ पार्टी &colon;<&sol;strong> आणखी एका नेत्रदीपक विजयानंतर आम्हाला आत्मचिंतन करणे भागच होते&period; एकाच पक्षाने सतत इतके विजय मिळवणे बरे नाही&period; &OpenCurlyQuote;पंचायत से पार्लियामेंट तक’ सर्वत्र कमळेच कमळे उगवत असल्यामुळे काही विरोधकांच्या पोटात दुखते&period; &OpenCurlyQuote;विजय हा ज्यांच्या डाव्या हाताचा मळ&comma; तेच कमळ’ अशी नवी घोषणा सुचते आहे&period; विजयामागून विजय मिळवल्यामुळे विजयाचे व्यसन लागते&comma; असे लोक म्हणतात&period; पण आम्हाला आत्मचिंतनाचे व्यसन लागले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>शिंदेसेना &colon;<&sol;strong> निवडणुकीनंतर आत्मचिंतनासाठी दिल्लीला जाऊन आलो&period; परम आदरणीय मोटाभाईंना भेटून बरेच आत्मचिंतन केले&period; दरे गावात आत्मचिंतन आश्रम उभा करतो आहे&period; तिथे भविष्यात वारंवार जावे लागेल&comma; असे दिसते&period; बघू&excl;<&sol;p>&NewLine;<p><strong>काँग्रेस &colon; आत्मचिंतन&quest; हे काय असतं&quest;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>घड्याळ पार्टी &colon;<&sol;strong> हे बघा&comma; निवडणुकीनंतर काय करावं&comma; आत्मचिंतन करावं की आणखी काही करावं&comma; हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे&period; बरीच वर्षं मी हा शब्द आत्मसिंचन असाच ऐकत होतो&comma; म्हणून त्या दिशेनं गेलोच नाही&period; एरवी आत्मचिंतन करतच असतो&period; इतके आत्मचिंतन केलं म्हणून आमची गाडी पुढे जाईना झाली&excl; आता या भानगडीत पडायचं नाही असं ठरवलं आहे&period; मरु दे&excl;<&sol;p>&NewLine;<p><strong>उबाठा &colon;<&sol;strong> आम्हाला कोणी आत्मचिंतन शिकवण्याची गरज नाही&period; मर्दाची औलाद असाल तर स्वत&colon;च आत्मचिंतन कराल&excl; आम्हाला काय सांगता&quest; आम्ही या कमळवाल्यांना एके काळी जवळ केलं नसतं&comma; तर आज हे दिसलेही नसते&excl;&excl; गद्दारांनी आत्मचिंतन करावं&comma; आम्हाला त्याची गरज नाही&period; हे असले प्रकार मराठी माणूस कधीही सहन करणार नाही&comma; हे लक्षात ठेवा&excl;<&sol;p>&NewLine;<p><strong>मनसेना &colon;<&sol;strong> आत्मचिंतन करण्यात वेळ घालवल्यामुळेच आमचा पक्ष इथवर पोचला आहे&period; थोडे तरी नगरसेवक निवडून यावेत म्हणून आम्ही वेळोवेळी आत्मचिंतन केले&period; काही वेळेला &OpenCurlyQuote;लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत एका पक्षाला धारेवर धरले&comma; आत्मचिंतनानंतर त्याच पक्षाला बिनशर्ट पाठिंबा दिला&period; ज्यांच्याबरोबर वैर धरले&comma; त्यांच्याशीच मनोमिलन केले&period; काय नाही केले&quest; पण आत्मचिंतन केल्यामुळे मते मिळत नाहीत&comma; असे आता लक्षात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version