spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विरोध केला, तरुणीला थेट रुळावर फेकलं

– मुंबई लोकलमध्ये धक्कादायक प्रकार

मुंबई :- महिलांसाठी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. बोरिवलीहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये छेडछाडीला विरोध करणाऱ्या एका तरुणीला नराधमाने बेदम मारहाण करत थेट चालत्या ट्रेनमधून बाहेर ढकलल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ४ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या दुर्घटनेत तरुणी रेल्वे रुळावर पडल्याने गंभीर जखमी झाली असून, तिने या अपघातात आपला हात गमावला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ४ नोव्हेंबर रोजी पीडित तरुणी बोरिवली-विरार लोकलने प्रवास करत होती. प्रवासादरम्यान आरोपीने तिला चुकीचा स्पर्श करण्यास सुरुवात केली. तरुणीने त्याला विरोध करताच नराधमाने तरुणीला शिविगाळ करण्यास सुरुवात केली. तिने याचा विरोध केल्याने त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. या सगळ्या झटापटीत त्याने तिला नायगाव रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकजवळ चालत्या लोकलमधून खाली ढकलून दिले.

रुळावर पडल्याने तरुणीला गंभीर दुखापत झाली असून सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरुणी तिची प्रकृती स्थिर असली तरी या घटनेने तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे.

पीडितेचा आक्रोश आणि पोलिसांवर गंभीर आरोप

“तो इसम मला बॅड टच करत होता, मी विरोध केला म्हणून त्याने मला शिवीगाळ व मारहाण केली आणि लोकलमधून ढकलून दिले. या घटनेत माझा हात गेला असून माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे, मला न्याय हवा,” अशा शब्दांत पीडित तरुणीने आपला आक्रोश व्यक्त केला आहे.

Popular Articles