Home Latest News धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी दीक्षाभूमीवर चोख सोयी-सुविधा द्या – प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे...

धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी दीक्षाभूमीवर चोख सोयी-सुविधा द्या – प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांचे निर्देश

0

<p><strong>&&num;8211&semi; विभागांनी समन्वयाने नियोजन करण्याचे आवाहन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> नागपूर येथील दीक्षाभूमीवर 20 ऑक्टोबर रोजी साजरा होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन हा देशभरातील अनुयायांसाठी महत्त्वाचा सोहळा आहे&period; या सोहळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या लाखो अनुयायांना आवश्यक सोयी-सुविधा वेळेत आणि सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी परस्पर समन्वयाने सूक्ष्म नियोजन करावे&comma; असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ&period; हर्षदीप कांबळे यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते&period; बैठकीला प्रभारी विभागीय आयुक्त तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद&comma; पोलीस उपायुक्त संदीप पखाले&comma; आदित्य मिरखेलकर&comma; सिंगा रेड्डी&comma; समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे&comma; प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते&period; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार अनुयायांच्या सोयी-सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करून महोत्सवाचे नियोजन करावे&comma; असे डॉ&period; कांबळे यांनी सांगितले&period;<img class&equals;"alignnone wp-image-66325 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;09&sol;WhatsAppImage2026-09-25at17&period;14&period;36&lowbar;copy&lowbar;800x440&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"440" &sol;><&sol;p>&NewLine;<p>यावेळी समाज कल्याण विभागाच्या वतीने अनुयायांसाठी करण्यात येणाऱ्या सुविधांचे सादरीकरण करण्यात आले&period; दीक्षाभूमी परिसरात निवासासाठी जर्मन हँगर तंत्रज्ञानावर आधारित निवारा कक्ष उभारण्यात येणार असून&comma; त्यामध्ये पंखे&comma; कुलर्स&comma; प्रकाशयोजना तसेच अंथरूण-पांघरूणाची व्यवस्था करण्यात येणार आहे&period; या निवारा कक्षांना डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याशी संबंधित नावे देण्यात येणार आहेत&period; निवारा कक्षांच्या परिसरात संविधान साहित्याची &OpenCurlyQuote;भीमसृष्टी’ उभारण्यात येणार आहे&period; तसेच तक्रार निवारण केंद्र&comma; महिलांसाठी हिरकणी कक्ष&comma; बालकांसाठी खेळण्याची जागा आदी व्यवस्था करण्यात येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>अनुयायांच्या आरोग्याच्या दृष्टीने औषधसाठा&comma; वैद्यकीय कक्ष&comma; मोबाईल हॉस्पिटल आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात येणार आहे&period; महिला&comma; बालके आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून देण्यात येतील&period; स्वच्छतेसाठी नियमित स्वच्छता&comma; जंतुनाशक व डास प्रतिबंधक फवारणी&comma; मोबाईल टॉयलेट्स आणि कचराकुंड्यांची पुरेशी व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या&period;<&sol;p>&NewLine;<p>अनुयायांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त&comma; महिला सुरक्षा पथक&comma; अग्निशमन दल आणि नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्यात येणार आहे&period; तसेच अनुयायांना आवश्यक माहिती मिळावी यासाठी हेल्पलाइन क्रमांक&comma; दिशादर्शक नकाशे आणि उद्घोषणा प्रणालीची व्यवस्था करण्यात येणार आहे&period; सर्व विभागांनी समन्वयाने काम करून धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा सुरळीतपणे पार पाडावा&comma; असे निर्देश यावेळी देण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version