spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

क्रीडांगण व शाळेची आरक्षित जागा ‘कृषी झोन’ मध्ये करण्यास रिपब्लिकन भीमशक्तीचा विरोध

कन्हान :- नगरपरिषद कन्हान-पिपरी विकास आरा खड्यातील कन्हान-सिहोरा येथील क्रीडांगण व प्राथ मिक शाळेसाठी आरक्षित जागा ‘कृषी ‘ मध्ये समाविष्ट करण्याच्या हालचालींना रिपब्लिकन भीमशक्तीने तीव्र विरोध दर्शविला आहे. हा निर्णय जनहिताच्या विरोधा तील असुन तो तात्काळ रद्द करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

रिपब्लिकन भीमशक्ती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर भिमटे यांनी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत या प्रकरणावर आक्षेप नोंदवला आहे. निवे दनानुसार, कन्हान-सिहोरा येथील सर्वे क्रमांक १०२, १०३ व १०४ मधिल क्रीडांगण आणि प्राथमिक शाळे साठी आरक्षित जागेचे आरक्षण रद्द करून ती कृषी झोन मध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव पुढे आला अस ल्याचा आरोप करण्यात आला आहे. संघटनेने म्हटले आहे की, ही जागा स्थानिक नागरिक, विशेषतः युवकांच्या क्रीडा व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे आरक्षण रद्द करणे म्हणजे भविष्यातील पिढ्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष कर ण्यासारखे असुन हा निर्णय सार्वजनिक हिताच्या विरोधातील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रशासनाने हा प्रस्ताव तात्काळ मागे घ्यावा व आरक्षित जागा ‘जैसे थे’ कायम ठेवावी, अन्यथा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात दाद मागण्यात येईल, असा इशारा ही रिपब्लिकन भीमशक्तीने दिला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, ग्रामविकास मंत्री तसेच मुख्यमंत्री यांच्याकडे ही तक्रार करण्यात आल्या ची माहिती देण्यात आली. तसेच या विषयात सकारा त्मक भूमिका न घेणाऱ्या संबंधित नगरसेवक व नगराध्यक्षांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ही संघटनेने केली आहे.

Popular Articles