spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कामगार कल्याण मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त कन्हानमध्ये वृक्षारोपण

– पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश. 

कन्हान :- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त कामगार कल्याण केंद्र, कन्हान च्या वतीने कन्हान पोलीस स्टेशन तसेच पशुवैद्यकीय दवाखाना परिसरात वृक्षारोपण करून वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कन्हान पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे या होत्या. प्रमुख अतिथी म्हणुन नगरसेवक हरिष तिडके, कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकुमार हातझाडे, सुहास पुंडे, शंकर नुरकर, शशांक राणे तसेच समाजसेविका स्नेहल राणे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे वृक्ष भेट देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर कन्हान पोलीस स्टेशन व पशुवैद्यकीय दवाखाना परिसरात विविध प्रजातींच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करताना, “वृक्ष हे पर्यावरणाचे खरे रक्षक असुन प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावुन त्याचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे. पर्यावर णाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणा सोबतच वृक्षसंवर्धनालाही तितकेच महत्त्व द्यावे,” असा प्रेरणा दायी संदेश दिला. कार्यक्रमाचे आयोजन, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केंद्र प्रमुख रंजना पौणीकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रेमा कावळे यांनी मोलाचे सहकार्य केले.

Popular Articles