– महाराष्ट्र राज्य कृषी विभाग लिपिक संवर्ग संघटना पुणे यांच्या अंतर्गत नागपूरमध्ये कृषी मंत्री दत्ताजी भरणे यांना आकृतीबंधाबाबत निवेदन सादर केले.
– कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध प्रतीक्षेत
नागपूर :- राज्यातील कृषी विभागाचा आकृतीबंध मागील सोळा वर्षापासून प्रलंबित असून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. खात्याचा आकृतीबंध लवकरच मंजूर करण्यात येत आहे असे भरीव आश्वासन नामदार दत्ताजी भरणे मामा कृषी मंत्री महोदयांनी दिलेले होते. चर्चेच्यावेळी अप्पर मुख्य सचिव कृषी विकासचंद्रजी रस्तोगी तसेच मा. आयुक्त कृषी सुरज मांढरे यांचा सहभाग होता. परिस्थिती जन्य विचारात घेऊन वेळोवेळी सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात येत असले बाबत संघटना सन 2017 पासून आकृतीबंधात सुधारणा व्हावी यासाठी सातत्याने शासनाची चर्चा करीत आली आहे. संवर्गीय अधिकारी कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यासाठी संप आंदोलने करावी लागतील तत्कालीन कृषिमंत्री महोदय माणिकराव कोकाटे यांना 18 जून 2025 रोजी मंत्रालय स्तरावर संघटने समवेत झालेल्या सकारात्मक चर्चेत मागण्यांसाठी निर्देश दिले होते. त्यानुसार आयुक्त कृषी महोदय सुरज मांढरे यांनी 24 जून 25 रोजी, पुणे येथे विविध संघटना यांना चर्चेला बोलावून सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. एवढेच नव्हे तर आश्वासन पूर्ती करून तसेच सुधारित प्रस्ताव शासनात सुद्धा सादर केले आहे. आकृतीबंधातील ठळक मुद्दे पुढे नमूद करण्यात येत असून नववर्षात सुरुवातीला आकृतीबंधास मंजुरी मिळावी अशी विनंती वजा मागणी संघटनेच्या वतीने शासनास करण्यात आली. आमच्या प्रलंबित मागण्या खालील प्रमाणे :
१) खात्याचा आकृतीबंध लवकरात लवकर मंजूर करण्यात यावा.
२) सहाय्यक प्रशासकीय अधिकारी ही पदे 100% व दोन्हीत नपे भरण्यात यावीत व सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यात यावी.
३) खात्यांचा आकृतीबंध सहाय्यक अधीक्षक ही पदे अधीक्षक संवर्गात समाविष्ट करण्यात यावीत. तसेच सेवा प्रवेश नियमांमध्ये बदल करण्यात यावा.
४) वरिष्ठ लिपिक पदे लिपिक संवर्गातून १०० टक्के पदोन्नतीने भरण्यात यावी. तसेच सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा करण्या यावी.
५) खात्यातील लिपिक संवर्गीय 102 चिन्हाकिंत पदे आकृतीबंधांमध्ये समाविष्ट करण्यात यावीत.
६) कृषी विभागातील जून 2025 मध्ये सर्व संवर्गीय झालेला संप कालावधी नेहमी करण्यात यावा.
७) राज्यातील इतर खात्याप्रमाणे वेतनश्रेणी ग्रेड पे वाढवून मिळावा.
८) कृषी सहसंचालक (आस्थापना) ह्या पदाचे नामकरण संचालक प्रशासन असे करण्यात यावी. यावेळी शिष्टमंडळात संस्थापक अध्यक्ष मुकुंद पालटकर यांच्या उपस्थितीत सर्वश्री जाकीर हुसेन मुलानी, सुशांत कांबळे उपाध्यक्ष, हेमंत पिंपळापुरे सहसचिव, रघुनाथ रागीट जिल्हा सचिव, विजय कटारे जिल्हाध्यक्ष आणि सुधाकर सार्वे सल्लागार यांची उपस्थिती होती. या सर्वां मिळून कृषीमंत्री दत्ताजी भरणे यांना आकृतीबंध निवेदन सादर करण्यात आले.




