spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

समता सैनिक दल शाखा कोदामेंढी तर्फे आरक्षणाचे जनक श्री छत्रपती शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी 

किशोर साहू, मौदा :- शुक्रवार (ता. 26 जून )ला समता सैनिक दल शाखा कोदामेंढी तर्फे संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढून व वार्ड क्रमांक 4 स्थित बौद्ध विहारात आरक्षणाचे जनक श्री छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनपटावर प्रकाश टाकून त्यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या समारोप अल्पोआहाराणे करण्यात आला.

           याप्रसंगी भाजपा मौदा मंडळ अध्यक्ष भगवान बावनकुळे,उपसरपंच गोपाल गिरमेकर, सामाजिक कार्यकर्ते माजी उपसरपंच प्रकाश भगवान मेश्राम, संदीप गजभिये,नरेश बावणे,समता सैनिक दल वाडी शाखा प्रमुख फुलचंद गजभिये, केशव डोंगरे, हिंगणा येथील सैनिक सविता मेश्राम, नवेगाव (धुसाळा) येथील प्रमुख पवित्रा बन्सोड, सैनिक प्रणिता शेंडे, अडेगाव येथील सैनिक प्रतिभा वासनिक सह खेडी (खोपडी ),खंडाळा येथील समता सैनिक दलाचे पदाधिकारी व सदस्य गण उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समता सैनिक दल शाखा कोदामेंढी प्रमुख पंचफुला नंदेश्वर, पदाधिकारी सदानंद वाघमारे, रमेश धुर्वे, रुपेश मेश्राम, उमा लोणारे, सुनंदा मसराम, कविता बावनकुळे, रत्ना तरटे, रत्ना लाडेकर, कांता गायधने, सुरेखा गजघाटे, कल्पना रामटेके, समा लोणारे ,सपना भैसारे, मीनल महाजन सह समस्त सदस्य गणांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या समारोप अल्पोआहारणे करण्यात आला.

Popular Articles