Home Latest News संजय राऊत जनतेमध्ये घबराट पसरवून इंधन साठेबाजी करण्यास भाग पाडत आहेत

संजय राऊत जनतेमध्ये घबराट पसरवून इंधन साठेबाजी करण्यास भाग पाडत आहेत

0

<p><strong>&&num;8211&semi; भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा प्रहार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;- <&sol;strong>संजय राऊत हे इंधन&comma; गॅस तुटवड्याबाबत घबराट पसरवत अराजक माजवण्याचा प्रयत्न करत आहेत&period; घबराटीमुळे लोकांना इंधन साठेबाजी करण्यास राऊत भाग पाडत असल्याचा प्रहार भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला&period; राऊत आणि विरोधक जाणीवपूर्वक जनतेमध्ये चुकीच्या बातम्या पेरत असल्यामुळे लोकं नाहक इंधन आणि गॅस मिळवण्यासाठी लांब रांगा लावत आहेत&period; खरेतर भारताचा तिरंगा पाहून भारतीय जहाजांना हॉर्मुझ सामुद्रधुनीतून इंधन घेऊन जाणा-या जहाजांना जाण्यास परवानगी मिळत आहे&period; तसेच देशात 2 महिने पुरेल इतका इंधन साठा शिल्लक असून घाबरण्याचे कारण नाही&period; जनतेने सतर्क राहून राऊत आणि विरोधकांचा डाव उधळून लावावा असेही त्यांनी नमूद केले&period;<&sol;p>&NewLine;<p>बन म्हणाले की&comma; इराण-इस्रायल युद्धामुळे जगभरात इंधन&comma; गॅस पुरवठा विस्कळीत झाला असताना केंद्र सरकार आणि महायुती सरकार युद्धस्तरावर जनतेला दिलासा देण्याचे काम करत आहेत&period; एलपीजी गॅस सिलेंडर धारकांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने शिधापत्रिका धारकांना प्रत्येकी 3 लिटर रॉकेल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>राऊतांना लक्ष्य करत बन म्हणाले की&comma; काँग्रेसचे तीर्थ पिऊन पावन झालेल्या संजय राऊतांना हिंदुत्वाची किंमत कळणारच नाही&period; एनडीए सरकार आणि महायुती सरकारला विरोधाला विरोध करायचा या धोरणानुसार संजय राऊत इराण-इस्त्रायल युद्धामुळे जगभरात इंधन&comma; गॅस पुरवठा विस्कळीत झाला असताना महायुती सरकारतर्फे रेशनकार्ड धारकांना पुरवण्यात येणा-या रॉकेलचा संबंध हिंदुत्वाशी जोडत आहेत&period; यातून राऊत हे त्यांची वैचारिक दिवाळखोरी सिद्ध करत आहेत अशी टीकाही बन यांनी केली&period; जनतेला दिलासा देण्यासाठी आखलेल्या उपाययोजनांमध्येही संजय राऊत घाणेरडे राजकारण करत आहेत&period; हिंदुत्वावरून भाजपा आणि केंद्र सरकारवर टीका करण्याचा राऊतांना अधिकार नाही असेही त्यांनी खडसावले&period;<&sol;p>&NewLine;<p>बन म्हणाले की&comma; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळे या संकटात भारतीयांना झळ पोहोचत नाही आहे&period; केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा तर डिझेलवर तर शून्य टक्के उत्पादन शुल्क केल्याने जनतेला दिलासा मिळत आहे&period; श्रीलंका&comma; बांगलादेश&comma; पाकमध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमती साडे तीनशे रुपये प्रति लिटर झाल्या असून भारतात मात्र या किमती आवाक्यात ठेवण्यात पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्रालयांना यश आले असल्याचेही ते म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p>उबाठा गटामध्ये ठाकरे गट विरुद्ध राऊत गट असे द्वंद्व रंगले असून आता आदित्य ठाकरेंबद्दल खोट्या बातम्या पेरण्यापर्यंत राऊतांची मजल गेली असल्याची टीका श्री&period; बन यांनी केली&period; याआधीही राज्यसभेच्या जागेवरून राऊतांनी ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदींना बाजूला सारून शरद पवारांचे नाव पुढे केले होते&comma; याची आठवण करून देत बन म्हणाले की&comma; आदित्य ठाकरे यांची बदनामी करत राऊत खासदारकी पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसणार आहेत&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version