spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पेंच नदीत बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

सचिन चौरसिया,रामटेक :- तालुक्यातील सालई (माहुली ) शिवारातील पेंच नदीच्या पात्रात आंघोळीसाठी उतरलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याचा प्रकार बुधवार दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडला. सुरेंद्र पतिराम कुंबरे (वय २५) रा. हेटी मनसर त. रामटेक जि. नागपूर असे पेंच नदीत बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. हेटी मनसर येथील रहिवासी सुरेंद्र पतिराम कुंबरे हा तरुण बुधवार (दि.१०) रोजी अधिकमासनिमित्य सालई ( माहुली) शिवारातील पेंच नदीच्या पात्रात आंघोळीसाठी मित्रांसोबत गेला असता, नदीपात्रात वाळू उपसामुळे नदीपात्रात खोल गड्डे निर्माण झाले आहे. मात्र नदीतील पाण्याची खोली लक्षात न आल्याने सुरेंद्र अचानक बुडाला. त्यांच्या मित्राने तातडीने त्याला बाहेर काढून मदत करण्याच्या प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होताच त्याला उपचारासाठी पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले असून पुढील तपास पारशिवनी पोलीस करीत आहे करण्यात आले.

Popular Articles