Home Latest News विभागात तीन टप्प्यात ‘सेवा पंधरवडा ; अनुकंपा व सरळसेवेतील 2 हजार उमेदवारांना नियुक्तीपत्र – ...

विभागात तीन टप्प्यात ‘सेवा पंधरवडा ; अनुकंपा व सरळसेवेतील 2 हजार उमेदवारांना नियुक्तीपत्र –  विभागीय आयुक्त बिदरी

0

<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>सर्वोत्तम तीन जिल्ह्यांची होणार निवड<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>प्रत्येक जिल्ह्यात दोन नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>नागपूर &comma;  १3<&sol;strong> &colon; छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये विविध उपक्रम राबवून तीन टप्प्यात &OpenCurlyQuote;सेवा पंधरवडासाजरा होणार आहे&period; विभागातील अनुकंपा तत्वावरील गट &OpenCurlyQuote;क’आणि गट &OpenCurlyQuote;ड’ पदांसाठी १२५० तर सरळसेवेद्वारे लिपीक पदावरील ६७५ उमेदवरांना पंधरवडया दरम्यान नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे&period;सेवा पंधरवडयातील उपक्रमांची प्रभावी अमंलबजावणी करणाऱ्या तीन सर्वोत्तम जिल्ह्यांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती&comma; विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज येथे दिली&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">सेवा पंधरवडया निमित्त विभागात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती  बिदरी यांनी पत्रकार परिषदेत दिली&period; लोकाभिमुख&comma;पारदर्शक व कार्यक्षम महसूल प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने महसूल व वने विभागामार्फत विभागात १७ ते २२ सप्टेंबर&comma; २३ ते २७ सप्टेंबर आणि २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर अशा तीन टप्प्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">पहिल्या टप्प्यात पाणंद रस्त्यांबाबत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे&period;याअंतर्गत गावांच्या पाणंद किंवा शिवरस्त्यांचे सर्वेक्षण करणे व त्यांना क्रमांक देण्याचे काम प्राधान्याने करण्यात येणार आहे&period;यासोबतच नोंद नसलेल्या रस्त्यांची नोंद घेण्याचे आणि शेतरस्त्यांच्या सीमांकन व रस्त्यांविषयीच्या तक्रारींचे निराकरण करण्याकरिता सीमांकन व रस्ता अदालतांचे आयोजन करण्यात येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">दुसऱ्या टप्प्यात  &OpenCurlyQuote;सर्वांसाठी घरे’ उपक्रम राबविण्यात येणार आहे&period; उपक्रमांतर्गत &OpenCurlyQuote;सर्वांसाठी घरे’ या शासकीय निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करून बेघरांना घर देण्याचे उद्दिष्टय ठेवण्यात आले आहे&period; शासकीय जमिनीवर गृहनिर्माणासाठी कब्जाहक्काने जमीन वाटप करणे&comma; झोपडपट्टी व इतर अनधिकृत बांधकामांचे नियमशीरकरण करणे आणि पात्र लाभार्थ्यांना पट्टेवाटप करण्यात येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">पंधरवडयाच्या तिसऱ्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्याला नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे उद्दिष्टय देण्यात आल्याचे  बिदरी यांनी सांगितले&period; याअंतर्गत नागपूर जिल्ह्यात १ व २ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मंडळस्तरावर &OpenCurlyQuote;समाधान दिवस’ आयोजित करण्यात येणार आहे&period; तर २९ व ३० सप्टेंबर रोजी प्रत्येक गावांमध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना डिबीटीचा लाभ देण्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विशेष शिबीर आयोजित करण्यात येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">वर्धा जिल्ह्यात विशेष उपक्रमांतर्गत वनहक्क धारकांना सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्याबाबत जनजागृती करून लाभ देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे&period; तसेच जिल्ह्यातील ७&sol;१२ जीवंत करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे&period;विशेष उपक्रमांतर्गत भंडारा जिल्ह्यात &OpenCurlyQuote;लक्ष्मी मुक्ती’ ही अभिनव योजना राबविण्यात येणार आहे&period;याअंतर्गत शेतीच्या अभिलेख्यांवर पत्नीचे नाव नोंदविण्यात येणार आहे&period;यासोबतच दिव्यांग लाभार्थ्यांना घरपोच धान्य वाटप करण्याचा उपक्रमही राबविण्यात येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">गोंदिया जिल्ह्यात विशेष उपक्रमांतर्गत &OpenCurlyQuote;लक्ष्मी मुक्ती’ योजना राबविण्यात येणार असून अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभ योजनेंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना घरपोच धान्य वाटप करण्यात येणार आहे&period; चंद्रपूर जिल्ह्यात विशेष उपक्रमांतर्गत चुकून वर्ग २ झालेल्या शेतजमिनींचे प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहे&period; तसेच&comma; जिल्ह्यातील गावांमध्ये गावकरी व स्थानिक प्राधिकरणाने मागणी केल्यानुसार स्मशानभूमीकरिता जागा उपलब्ध करून देण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे&period;विशेष उपक्रमांतर्गत गडचिरोली जिल्हयात महसूल मंडळ निहाय शाळा व महाविद्यालयांमध्ये शिबीर आयोजित करून शैक्षणिक प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार असून लक्ष्मी मुक्ती योजनेचीही अमंलबजावणी करण्यात येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>२ हजार उमेदवारांना पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">नागपूर विभागातील ६ जिल्ह्यांमधील अनुकंपा तत्वावरील रिक्त जागा भरण्याची महत्वाची कार्यवाही सेवा पंधरवडयामध्ये २५ ते ३० सप्टेंबर दरम्यान होणार आहे&period;यानुसार गट &OpenCurlyQuote;क’ च्या ४२४ आणि गट  &OpenCurlyQuote;ड’ च्या ८२६ अशा एकूण १२५० तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या विभागातील ६७५ लिपीक प्रवर्गातील उमेदवारांना<strong> <&sol;strong>पालकमंत्री यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>सर्वोत्तम तीन जिल्ह्यांची होणार निवड<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">सेवा पंधरवडा दरम्यान नियोजित कार्यक्रम व उपक्रमांची उत्कृष्ट अंमलबजावणी करणाऱ्या तीन जिल्ह्यांची निवड करण्यात येणार आहे&period; या सदंर्भातील पर्यवेक्षणासाठी विभागीय आयुक्तालयातील अधिकाऱ्यांची जिल्हा निहाय संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे&period; नागपूर जिल्हयासाठी प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी दिपाली मोतियेळे&comma;भंडारासाठी सह आयुक्त &lpar;पुनर्वसन&rpar; प्रदीप कुलकर्णी&comma; वर्धा जिल्ह्यासाठी अपर आयुक्त &lpar;महसूल&rpar; राजेश खवले&comma; चंद्रपूरसाठी अपर आयुक्त &lpar;सामान्य प्रशासन&rpar; तेजूसिंग पवार&comma; गडचिरोलीसाठी सह आयुक्त &lpar;रो&period;ह&period;यो&period;&rpar; अविनाश हरगल आणि गोंदियासाठी सह आयुक्त  &lpar;करमणूक&rpar; तुषार मठकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे&period; विविध मानकांवर सरस कामगिरी करणाऱ्या तीन जिल्ह्यांची नावे विभागीय आयुक्त कार्यालयाद्वारे मुख्यालयास पाठविण्या येणार असून यातील एका जिल्हयाची सर्वोत्कृष्ट जिल्हा म्हणून निवड करण्यात येणार असल्याचे  बिदरी यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version