spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जुडो चॅम्पियनशिप मध्ये शौर्य आंबिलढुगे यांनी कास्यपदक पटकावले

– नागपूर च्या शौर्याने बारा वर्षाखालील 30 किलो गटाच्या वजनात तिसरे स्थान

नागपूर :- एच.एस.महात्मे संस्कार विहार शाळेतील विद्यार्थी शौर्य प्रकाश आंबिलढुगे मुंबई येथे 24, 25 जानेवारी ला, प्रो जिगोरो कानो जुडो चॅम्पियनशिप मध्ये, बारा वर्षाखालील व 30 किलो वजन गटात, तिसरे स्थान मिळवून कास्य पदक मिळवले आहे. ही स्पर्धा बॉम्बे जुडो क्लब द्वारे आयोजित आणि चिल्ड्रेन अकॅडमी मालाड पूर्व मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. शौर्याला पुढील वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा. शाळेच्या सर्वेसवाऀ सौ.रजनी काळमेघ यांनी शाळेत त्याचा सत्कार करून कौतुक केले. त्याच प्रकारे कराटे इन्स्ट्रक्टर राजू दहीकर यांचे ही मार्गदर्शन लाभले. शौर्याचे उच्चस्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Popular Articles