Home Latest News जि. प. उच्च प्राथमिक शाळेमध्ये शिक्षकांची कमतरता

जि. प. उच्च प्राथमिक शाळेमध्ये शिक्षकांची कमतरता

0

<p><strong>शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आले निवेदन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>सचिन चौरसिया&comma; रामटेक ११ &colon;-<&sol;strong> बोरडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा विविध समस्यांची झगडत आहे&period; शाळेमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने येथील विद्यार्थ्यांना विविध समस्येला सामोरे जाण्याची वेळ येत असल्याने संबंधित शाळेला वाली कोण&quest; हा मुख्य प्रश्न पालकांना पडला आहे&period; मनसर केंद्रातील सर्वात जास्त पटसंख्या असणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोरडा येथे शिक्षक कमी असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शालेय नुकसान होत आहे&period; त्यामुळे ग्रामस्थ व उपसरपंचांनी प्रशासनाकडे २ अतिरिक्त शिक्षक देण्याची मागणी केली आहे&period; बोरडा शाळेत एकूण ८ वर्ग असून विद्यार्थ्यांची संख्या १७३ अशी आहे&period; येथे ८ शिक्षक कार्यरत होते&period; मात्र मे-जून महिन्याच्या कालावधीत त्यातील दोन शिक्षक सेवानिवृत्त झाल्यामुळे सध्या ६ शिक्षक कार्यरत आहे&period; शाळेत एकूण ८ वर्ग असून पटसंख्या ही जास्त असतांना ६ शिक्षक प्रत्येक वर्गांवर वेळ देऊ शकत नसल्याने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होतं आहे&period; याच गोष्टीची जाणीव घेत गावातील नागरिक व उपसरपंच पंकज चौधरी यांच्या नेतृत्वात शाळेला २ शिक्षक देण्याची मागणी गटविकास अधिकारी&comma;पंचायत समिती रामटेक व गटशिक्षणाधिकारी रामटेक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली&period; यावेळी गावचे उपसरपंच पंकज चौधरी&comma; प्रीतम वासनिक&comma; अभिजित रामटेके&comma; कुशाल राऊत&comma; वैभव शेंडे&comma;अजय लांजेवार उपस्थित होते<&sol;p>&NewLine;

Exit mobile version