Home Latest News युडीआयडी कार्डपासून वंचित दिव्यांगांसाठी विशेष शिबीर २२ सप्टेंबरपासून

युडीआयडी कार्डपासून वंचित दिव्यांगांसाठी विशेष शिबीर २२ सप्टेंबरपासून

0

<p><strong>&&num;8211&semi; मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी यांचे निर्देश<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> नागपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात आलेल्या दिव्यांग सर्वेक्षणामध्ये निदर्शनास आलेल्या युडीआयडी कार्ड पासून वंचित दिव्यांगांचे युडीआयडी कार्ड तयार करण्यासाठी २२ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे&period; यासंदर्भात संबंधित विभागांशी योग्य समन्वय साधून कार्यवाही करावी&comma; असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>दिव्यांगांचा एकत्रित डाटा संकलीत करण्यासाठी मनपाच्या आरोग्य विभागाच्या वतीने महात्मा गांधी सेवा संघ यांच्या माध्यमातून आशा सेविकांमार्फत दिव्यांग सर्वेक्षण करण्यात आले&period; या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार युडीआयडी कार्ड पासून वंचित दिव्यांगांचे युडीआयडी कार्ड तयार करण्याकरिता &OpenCurlyQuote;एसोपी’ निर्धारित करण्याकरिता गठीत समितीची बैठक गुरुवारी &lpar;ता&period;१८&rpar; पार पडली&period;<&sol;p>&NewLine;<p>मनपा आयुक्त यांच्या सभाकक्षात झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत&comma; अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी&period;&comma; उपायुक्त डॉ&period; रंजना लाडे&comma; वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ&period; दीपक सेलोकर&comma; शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधीक्षक डॉ&period; अविनाश गावंडे&comma; डॉ&period; स्नेहल शंभरकर&comma; इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉ&period; धर्मेंद्र मिश्रा&comma; डॉ&period; समता भटनागर&comma; मनपा अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ&period; नरेंद्र बहिरवार&comma; माता व बाल संगोपन अधिकारी डॉ&period; सरला लाड&comma; जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र चे प्रकल्प समन्वयक अभिजीत राऊत आदी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>पहिल्या टप्प्यात मनपाच्या माध्यमातून &OpenCurlyQuote;लोकोमोटर’ प्रकारचे दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांगांचे युडीआयडी कार्ड तयार करण्यात येणार आहे&period; सर्वेक्षणात शहरामध्ये २४ हजार ६३८ संभाव्य दिव्यांग असलेल्याचे निदर्शनास आले&period; यातील ९४७६ दिव्यांगांकडे युडीआयडी कार्ड आहे&period; तर १५ हजार १६२ दिव्यांग कार्ड पासून वंचित आहेत&period; कार्ड नसलेल्या या संभाव्य दिव्यांगांची तपासणी करून युडीआयडी कार्ड तयार करण्यासाठी प्रारंभी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये विशेष शिबीर २२ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत&period; ५० वर्षाखालील युडीआयडी कार्ड नसलेल्या &OpenCurlyQuote;लोकोमोटर’ प्रकारातील दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींकरिता प्राधान्याने हे शिबीर असणार आहे&period; टप्प्याटप्प्याने पुढे देखील शिबिराचे आयोजन केले जाणार आहे&period; यासंदर्भात नागपूर महानगरपालिका द्वारा लाभार्थी दिव्यांगांना झोननिहाय फोन व मेसेज द्वारे माहिती दिली जाणार आहे&period; मेसेजमध्ये कार्ड करिता आवश्यक कागदपत्रांची यादी व लोकेशन असावे&comma; असे आयुक्तांनी नमूद केले&period; जास्तीत जास्त दिव्यांगांचे कार्ड काढण्याबाबत सुरळीत प्रक्रिया व्हावी यासंदर्भात भेडसावणाऱ्या अडचणींच्या अनुषंगाने दिव्यांग विभागाच्या आयुक्तांशी पत्रव्यवहार करण्याबाबत आयुक्तांनी सूचित केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version