Home Latest News विद्यार्थ्यांना मिळणार वाहतूक नियमांचे नव्याने प्रशिक्षण

विद्यार्थ्यांना मिळणार वाहतूक नियमांचे नव्याने प्रशिक्षण

0

<div dir&equals;"ltr"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"ltr"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"ltr"><strong>मनपा आयुक्त यांच्या हस्ते चिल्ड्रन ट्राफिक पार्क नूतनीकरणाचे भूमिपूजन<&sol;strong><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"ltr"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"ltr"><strong>नागपूर&comma; ता&period; १४  &colon;<&sol;strong> नागरिकांना वाहतूक सुरक्षेबाबत प्रबोधन करण्याकरिता मा&period; केंद्रीय मंत्री श्री&period; नितीन गडकरी यांच्या खासदार स्थानिक विकास निधीतून नूतनीकरण केल्या जाणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या ज्ञानयोगी डॉ&period; श्रीकांत जिचकार ट्राफिक पार्कचा मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी यांच्या हस्ते बुधवारी &lpar;ता&period;१३&rpar; भूमिपूजन करण्यात आले&period; यावेळी मनपाचे उपायुक्त श्री&period; गणेश राठोड&comma; कार्यकारी अभियंता श्री&period; कमलेश चव्हाण&comma; उपअभियंता श्री&period; सचिन चमाटे व जनआक्रोशचे अध्यक्ष श्री&period; प्रकाश खांडेकर&comma; उपाध्यक्ष अनिल जोशी&comma; सचिव श्री&period; रवी कासखेडीकर यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते&period;<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"ltr">केंद्रीय मंत्री तथा खासदार नितिन गडकरी यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत सन 204-25 अंतर्गत ट्राफिक पार्क येथे आवेदन स्वीकार केंद्राकरिता शेडचे बांधकाम&comma; विद्यमान रस्त्यांचे डांबरीकरण&comma; वाहतुक दिशा दर्शक&sol; निर्देशक फलक उभारणे&comma; विद्यमान रस्त्यांना वाहतुक नियामवलीनुसार थर्मो प्लास्टिकच पेंटद्वारे दर्शक&sol; रंग रंगोटी करणे &lpar;झेब्रा क्रॉसिंग&comma; लेन मार्किंग ईत्यादी&rpar;&comma; विद्यमान रस्त्याच्या दोन्ही बाजुस पादचारी मार्गाची दुरुस्ती व सुस्तीती करणे&comma; शाळा &comma; दवाखाना&comma; बँक&lpar;एटीएम&rpar; शासकीय कार्यालय इत्यादीबाबत माहिती देण्याबाबत इमारतीचे प्रतिमा तयार करण्यात येणार आहे&period; या ट्रॉफिक पार्कमध्ये चालू शैक्षणिक सत्रात नागपुरातील विविध शाळांमधील विद्यार्थांना वाहतूक सुरक्षेचे प्रबोधन जनआक्रोशतर्फे करण्यात येणार आहे&period;<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"ltr">यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी यांनी चिड्रन ट्राफिक पार्कच्या नुतनीकरणासाठी मा&period; केंद्रीय मंत्री श्री&period; नितीन गडकरी यांच्या खासदार स्थानिक विकास निधी अंतर्गत विकास कामे करण्यात येत असल्याने श्री&period; गडकरी यांचे आभार मानले&period; पुढे डॉ&period; अभिजीत चौधरी म्हणाले की&comma; जबाबदार नागरिक घडविण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना वाहतुक नियमाचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे&period; हे प्रशिक्षण जनआक्रोशतर्फे चिल्ड्रन ट्राफिक पार्कमध्ये दिले जाणार असल्याने त्यांनी घेतलेल्या पुढाकाराची व वाहतुकीच्या नियमांबद्दल जनजागृतीबाबत प्रशंसा केली&period; ट्राफिक पार्कमधील गुणवत्ता पूर्ण कामासाठी व इतर मदतीसाठी मनपा सदैव तत्पर असल्याची ग्वाही डॉ&period; चौधरी यांनी यावेळी दिली&period;<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"ltr">यावेळी जन आक्रोश चे अध्यक्ष श्री&period; प्रकाश खांडेकर यांनीही या ट्राफिक पार्कच्या माध्यमातून बालमनावर वाहतुक नियमांचे चांगले संस्कार करण्यात येणार असल्याचे सांगितले&period; जन आक्रोशचे सचिव श्री&period; रवी कासखेडीकर यांनी जनआक्रोशतर्फे करण्यात येत असलेल्या वाहतुक नियमांच्या जनजागृती बाबत विस्तृत माहिती दिली&period;<&sol;div>&NewLine;

Exit mobile version