Home Latest News शरण आलेल्या नक्षलवाद्यांनी उघड केला शस्त्रनिर्मिती कारखान्याचा भांडाफोड

शरण आलेल्या नक्षलवाद्यांनी उघड केला शस्त्रनिर्मिती कारखान्याचा भांडाफोड

0

<p><strong>&&num;8211&semi; गडचिरोलीत जमिनीत लपवलेला शस्त्रसाठा जप्त<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>गडचिरोली &colon;-<&sol;strong> महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी कारवाया जवळपास संपुष्टात येत असल्या तरी सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी नक्षलवादी अजूनही जंगलांमध्ये शस्त्रे आणि स्फोटक सामग्री लपवून ठेवत असल्याचे समोर आले आहे&period; महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील दुर्गम जंगलांचा फायदा घेत माओवादी गुप्तपणे शस्त्रनिर्मिती आणि स्फोटक तयार करण्याचे काम करत होते&period; 23 मे रोजी गडचिरोलीत करण्यात आलेल्या कारवाईनंतर सुरक्षा दलांना पुन्हा एक मोठे यश मिळाले आहे&period; शोध मोहिमेदरम्यान जंगलातील जमिनीखाली लपवून ठेवलेला मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि स्फोटक सामग्री जप्त करण्यात आली&period; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार घटनास्थळीच नक्षलवाद्यांची शस्त्रनिर्मिती सामग्री आणि उपकरणे नष्ट करण्यात आली&period; ही कारवाई पोलीस अधीक्षक एम&period; रमेश आणि इतर अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>शरण आलेल्या नक्षलवाद्यांकडून मिळाली माहिती<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>पोलिसांना ही माहिती शरण आलेल्या नक्षलवाद्यांकडून मिळाली&period; अलीकडेच आत्मसमर्पण केलेल्या काही नक्षलवाद्यांची चौकशी केली असता त्यांनी या गुप्त ठिकाणाची माहिती दिली&period; छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यातील काकूर पोलीस ठाणे हद्दीपासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावर महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील जंगलात शस्त्रे आणि शस्त्रनिर्मिती साहित्य लपवून ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली होती&period; त्यानुसार संयुक्त शोध मोहीम राबवण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>नक्षलवाद्यांच्या पुरवठा साखळीला मोठा धक्का<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>या कारवाईदरम्यान सुरक्षा दलांनी शस्त्रनिर्मितीसाठी वापरण्यात येणारी लेथ मशीन&comma; वीजपुरवठ्यासाठी सोलर पॅनल आणि जनरेटरसह विविध साहित्य जप्त केले&period; या गुप्त कारखान्याचा पर्दाफाश झाल्याने नक्षलवाद्यांच्या शस्त्रपुरवठा साखळीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>1 इंसास रायफल<&sol;p>&NewLine;<p>2 क्लेमोर माईन<&sol;p>&NewLine;<p>2 सिंगल शॉट रायफल<&sol;p>&NewLine;<p>110 डेटोनेटर आणि कॉर्टेक्स वायर<&sol;p>&NewLine;<p>12 बोर रायफल<&sol;p>&NewLine;<p>500 हून अधिक बीजीएल<&sol;p>&NewLine;<p>12 जिवंत काडतुसे<&sol;p>&NewLine;<p>7 बीजीएल लॉन्चर<&sol;p>&NewLine;<p>12 बोर रायफलची काडतुसे<&sol;p>&NewLine;<p>3 ट्यूब लॉन्चर<&sol;p>&NewLine;<p>25 किलो आयईडी स्फोटक<&sol;p>&NewLine;<p>2 लेथ मशीन<&sol;p>&NewLine;<p>या कारवाईमुळे नक्षलवाद्यांच्या हालचालींवर मोठा परिणाम होणार असल्याचा विश्वास सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version