– पुस्तिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन; आमदार अँड. अभिजीत वंजारी यांचा सत्कार
नागपूर :- विवाह इच्छुक युवक- युवतींना योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जवाहर विद्यार्थी गृह, नागपूर च्यावतीने सोमवार, ९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता. ‘सुयोग’ वधू-वर परिचय पुस्तिका प्रकाशन सोहळा व परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम वेस्ट हायकोर्ट रोड, सिव्हिल लाइन्स येथील जवाहर विद्यार्थीगृहात होणार आहे. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नरेंद्रकुमार दिवटे राहतील. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य तथा आमदार अँड.अभिजीत वंजारी यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहतील व त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. ज्येष्ठ अधिवक्ता अँड. आनंदाराव गिरडकर आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. आरती सुभाष वंजारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी ‘सुयोग’ वधू-वर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणार असून, विवाह इच्छुक युवक – युवती व त्यांच्या पालकांना एकमेकांशी परिचय करून घेण्याची संधी मिळणार आहे. मेळाव्यास प्रवेश पूर्णतः विनामूल्य असून पुस्तिका सहयोग राशीमध्ये उपलब्ध राहणार आहे. कार्यक्रमानंतर सहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी विवाह इच्छुक युवक -युवती, पालक आणि समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जवाहर विद्यार्थी गृहाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.








