– ए.एफ.सी. इंडिया लिमीटेड तर्फे आयोजन
सचिन चौरसिया, रामटेक :- स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा -२ अंतर्गत महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद नागपूर व प्रशिक्षण संस्था ए. एफ. सी. इंडिया लिमिटेड तर्फे पंचायत समिती रामटेक मध्ये महिला बचतगटांना दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षणात गावाच्या स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गट विकास अधिकारी जयसिंग जाधव यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी महिलांना गावातील स्वच्छतेबाबत प्रशिक्षणातून मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणात २४ ग्रामपंचायतमधून निवड झालेल्या महिला बचत गटातील ७२ महिलांचा समावेश होता. त्यांना स्वच्छता आणि त्यांची उपायोजना संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. सहा. गट विकास अधिकारी, मारोती भुजाडे, विस्तार अधिकारी (पंचायत), बनसोड (एमएसआरएलएम ), एएफसी इंडिया लिमिटेड नवी दिल्ली प्रशिक्षक प्रविण, सुनील गजभिये व दिलीप दिवटे यांनी विविध स्वच्छता आणि त्यांची उपाययोजना या विषया संदर्भात प्रशिक्षण दिले. गट समन्वयक राजीव मडामे, महेंद्र बुरले समूह समन्वयक, संजीवनी घारपांडे समूह समन्वयक यांनी मोलाचे सहकार्य केले.

