Home Latest News ऐतिहासिक सहल आणि नैसर्गिक वातावरणात, खेळीमेळीत व्यापारी कल्याणकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा...

ऐतिहासिक सहल आणि नैसर्गिक वातावरणात, खेळीमेळीत व्यापारी कल्याणकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.

0

<p><strong>खापा&comma; १३ &colon;<&sol;strong>  व्यापारी कल्याणकारी संस्था&comma; खापाची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष अशोक पेटकर यांच्या अध्यक्षतेत दि&period; 11 सप्टेंबर गुरुवारला पार पडली&period; नागपूर जिल्ह्यात प्रथमतःच वार्षिक सर्वसाधारण सभा ही व्यापारी कल्याणकारी संस्था खापा हिने एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने सहलीच्या स्वरूपात आयोजित केली होती&period; या सभेचे नियोजन किशोर आष्टणकर&comma; वीरेंद्र तातेड&comma; मकसूद शेख यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p>या सभेचे औचित्य साधून व्यापाऱ्यांची ऐतिहासिक सहल कलारंग टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संचालक आकाश मारोतकर यांच्या मार्गदर्शनात काढण्यात आली&period; ही सहल १८ व्या शतकात&comma; नागपूरचे भोसले राजे रघुजी भोसले यांनी देवगड जिंकल्यानंतर बांधण्यात आलेले रामटेक गड मंदिर&comma; रामटेकमध्ये १२व्या शतकात यादव घराण्याने बांधलेले एक प्राचीन जलकुंड आणि मंदिर असलेली कर्पुर बावली&comma; इ&period;स&period; चौथ्या शतकात वाकाटक राजवंशाची राजधानी असलेला नगरधन येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ला&comma; घोगरा महादेव पारशिवणी या ठिकाणी आनंदमय&comma; नैसर्गिक&comma; ऐतिहासिक वातावरणात पार पडली&period;<&sol;p>&NewLine;<p>सभेमध्ये संस्थेचे सदस्य मकसूद शेख यांनी इतिवृत्त वाचन करून वार्षिक जमाखर्चाचा हिशोब मांडला&period; तसेच सभेत विविध विषयावर चर्चा करण्यात आली&period; तर अध्यक्ष पेटकर यांच्या मान्यतेनुसार सर्वानुमते विषय पारित करण्यात आले&period; संस्थेचे सदस्य तेजराम गाडीगोणे&comma; सुनील डेकाटे यांनी व्यापाऱ्यांच्या सहकार्यातून संस्था आर्थिक स्वरूपात बळकट कशी होईल यावर मार्गदर्शन केले&period; तसेच संस्थेचे कोषाध्यक्ष किशोर आष्टणकर यांनी सभेस संबोधित करताना संस्था कासवाच्यागतीने चालत असुन भविष्यात नक्कीच संस्थेचा वट वृक्ष होईल&period; संस्थेवर टाकलेल्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही व संस्थेचा कारभार नेहमी पारदर्शक राहील&period; अशी सर्व संचालक मंडळाच्या वतीने ग्वाही दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>संस्थेची सभा अत्यंत शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली&period; सभेचे सूत्रसंचालन मकसूद शेख यांनी केले&period; तर प्रस्तावना सचिव विरेंद्र तातेड यांनी मांडली&period; तर अनिल &lpar;बंडू &rpar; मेनकुदळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी चिंतामण सुपारे&comma; तुळशीराम गाडीगोणे&comma; गजानन पडोळे&comma; नामदेव गाडीगोणे&comma; अनिल डेकाटे&comma; देवेंद्र श्रोते&comma; संदीप धार्मिक&comma; आशिष वारोतकर&comma; कृष्णा बारापात्रे&comma; प्रशांत बोंदरे&comma; अमोल खुबाळकर&comma; कैलास कापसे यांच्यासह संस्थेचे इतर सभासद व संचालक मंडळ आवर्जून उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<div class&equals;"yj6qo"><&sol;div>&NewLine;<div class&equals;"adL"><&sol;div>&NewLine;

Exit mobile version