Home Latest News २० एप्रिल रोजी होणार राजमाता राणी हिराई जन्मोत्सव सोहळा

२० एप्रिल रोजी होणार राजमाता राणी हिराई जन्मोत्सव सोहळा

0

<p><strong>चंद्रपूर &colon;-<&sol;strong> जिल्हा प्रशासनाच्या वतीने राजमाता राणी हिराई यांच्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे&period; हा सोहळा २० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता कोहिनूर मैदान&comma; दादमहाल वॉर्ड&comma; चंद्रपूर येथे संपन्न होणार आहे&period; या सोहळ्याचे उद्घाटन जिल्हयाचे पालकमंत्री डॉ&period; अशोक वुइके यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमास विविध मान्यवर लोकप्रतिनिधी&comma; अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>राजमाता राणी हिराई या गोंडवाना इतिहासातील एक प्रेरणादायी व गौरवशाली व्यक्तिमत्त्व असून त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त समाज प्रबोधन तसेच सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे&period; या माध्यमातून स्थानिक संस्कृतीचे जतन&comma; इतिहासाची जाणीव आणि नव्या पिढीमध्ये अभिमानाची भावना निर्माण करण्याचा उद्देश आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>यात राजमाता राणी हिराई बहुउद्देशीय सेवा समिती&comma; चांदवाड यांच्या वतीने १९ व २० एप्रिल दरम्यान वनउत्पादने तसेच हस्तकला प्रदर्शन व विक्री&comma; तसेच विविध पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे&period; यामध्ये गोंडी नृत्य&comma; पारंपरिक वाद्य&comma; लोककला सादरीकरणे&comma; तसेच स्थानिक कलाकारांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग राहणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>२० एप्रिल रोजी सकाळी विविध धार्मिक व पारंपरिक कार्यक्रम&comma; तर सायंकाळी ७ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे&period; या कार्यक्रमामध्ये पारंपरिक नृत्य&comma; गोंडी संस्कृतीचे दर्शन घडविणारे सादरीकरणे तसेच विविध कलाप्रकार सादर केले जाणार आहेत&period; तरी चंद्रपूर शहरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या जन्मोत्सव सोहळ्याचा लाभ घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी&comma; असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे<&sol;p>&NewLine;

Exit mobile version