Related Posts

अंगणवाडीतील पोषण आहार पुरवठ्याचे काम महिला बचत गटांकडून काढून ISKCON किंवा इतर खासगी संस्थांना देण्याचा निर्णय घेऊ नये यासाठी आहार पुरवठादार संघटना (CITU) तर्फे जिल्हाधिकारी भंडारा मार्फत महिला व बालविकास मंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले

<p>महाराष्ट्र राज्यातील हजारो महिला बचत गट अनेक वर्षांपासून अंगणवाडीतील बालकांना&comma; गरोदर माता व स्तनदा मातांना पोषण आहार पुरविण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने करीत आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>महिला बचत गटांनी केवळ आहार पुरवठ्याचे काम केलेले नाही&comma; तर राज्यातील बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी&comma; बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि माता-बालकांच्या पोषणविषयक स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी शासनाच्या प्रयत्नांना मोलाची साथ दिली आहे&period; अनेक वर्षांपासून या महिला अत्यंत कमी मोबदल्यातसुद्धा आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडत आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>आज या कामाच्या माध्यमातून हजारो गरीब&comma; गरजू आणि ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळत आहे&period; अनेक महिलांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या कामावर अवलंबून आहे&period; महिला बचत गटांनी स्वतःचे आर्थिक नियोजन करून&comma; कर्ज काढून&comma; भांडी&comma; गॅस&comma; स्वयंपाकाची साधने आणि इतर आवश्यक साहित्य खरेदी करून या कामासाठी गुंतवणूक केली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>अशा परिस्थितीत महिला बचत गटांकडून हे काम काढून इतर मोठ्या संस्था किंवा खासगी संस्थांना दिल्यास हजारो महिलांचा रोजगार हिरावला जाईल&period; त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवेल&period; महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबनासाठी शासनाने राबविलेल्या योजनांचा उद्देशच निष्फळ ठरेल&period;<&sol;p>&NewLine;<p>महिला बचत गटांना काम देण्यामागील मूळ उद्देश महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे&comma; त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे आणि स्थानिक पातळीवर पोषण आहाराची व्यवस्था मजबूत करणे हा आहे&period; त्यामुळे या महिलांना डावलून मोठ्या संस्थांना काम देणे हा महिला सक्षमीकरणाच्या धोरणाला विरोधाभास ठरेल&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>मागण्या पुढीलप्रमाणे आहेत &colon;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>1&rpar; अंगणवाडीतील पोषण आहार पुरवठ्याचे काम महिला बचत गटांकडून काढून घेऊ नये&period;<&sol;p>&NewLine;<p>2&rpar; महिला बचत गटांचे रोजगार आणि उपजीविकेचे साधन कोणत्याही परिस्थितीत बंद करू नये&period;<&sol;p>&NewLine;<p>3&rpar; अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या महिला बचत गटांना प्राधान्य देऊन त्यांचे काम कायम ठेवावे&period;<&sol;p>&NewLine;<p>4&rpar; महिला बचत गटांना योग्य मोबदला&comma; वेळेवर देयके आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात&period;<&sol;p>&NewLine;<p>5&rpar; कोणताही नवीन शासन निर्णय घेण्यापूर्वी महिला बचत गटांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे&period;<&sol;p>&NewLine;<p>6&rpar; भंडारा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यरत महिला बचत गटांचे रोजगार सुरक्षित ठेवण्याबाबत स्पष्ट शासन निर्णय काढावा&period;<&sol;p>&NewLine;<p>महिला बचत गटांच्या महिला या केवळ आहार बनविणाऱ्या महिला नाहीत&comma; तर त्या शासनाच्या कुपोषण निर्मूलनाच्या लढ्यातील महत्त्वाच्या भागीदार आहेत&period; त्यांनी अनेक वर्षे आपल्या मेहनतीने आणि सेवाभावाने अंगणवाडीतील बालकांच्या पोषणासाठी योगदान दिले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>आज त्यांच्याकडून हे काम काढून घेतले गेले&comma; तर केवळ त्यांचा रोजगार जाणार नाही&comma; तर त्यांच्या कुटुंबांचे आर्थिक भविष्यही धोक्यात येईल&period; महिला स्वावलंबी व्हाव्यात&comma; त्यांना रोजगार मिळावा&comma; या शासनाच्या उद्देशालाच बाधा पोहोचेल&period;<&sol;p>&NewLine;<p>म्हणून आपण या विषयात तातडीने लक्ष घालून महिला बचत गटांचे रोजगार सुरक्षित ठेवावेत आणि अंगणवाडीतील पोषण आहार पुरवठ्याचे काम पूर्वीप्रमाणे महिला बचत गटांकडेच कायम ठेवावे&comma; ही नम्र विनंती&period;<&sol;p>&NewLine;<p>आपण महिला बचत गटांच्या हजारो महिलांच्या रोजगाराचा आणि त्यांच्या कुटुंबांच्या भविष्याचा सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घ्याल&comma; अश्या मागणीचे निवेदन आहार पुरवठादार संघटना &lpar;CITU&rpar; तर्फे जिल्हाधिकारी भंडारा मार्फत महिला व बालविकास मंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले यावेळी CITU चे जिल्हा मार्गदर्शक नरेंद्र रामटेके&comma;विद्या थोटे&comma; अंतकला बावनकुळे&comma; ज्योती भानारकर&comma;उमा चटप&comma; दुर्गा धकाते&comma; सविता कटकवार&comma; सविता डोरले&comma; आर डी पाठक &comma; अलका लांजेवार&comma; रेखा रामटेके&comma;मेश्राम व इतर कार्यकर्ते उपस्थित होते&&num;8230&semi;<&sol;p>&NewLine;