Home Latest News कामाख्या देवीच्या मंदिरात 55 रेडे कापून आलेलं सरकार दुसऱ्यांच्या कुर्बानीला विरोध करतंय...

कामाख्या देवीच्या मंदिरात 55 रेडे कापून आलेलं सरकार दुसऱ्यांच्या कुर्बानीला विरोध करतंय – संजय राऊत

0

<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कुर्बानीच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले आहे&period; भाजपच्या सात आमदारांसह अनेक नेत्यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून हाऊसिंग सोसायटी&comma; रहिवासी संकुल आणि चाळींमध्ये बकऱ्यांची कुर्बानी करण्यास परवानगी देऊ नये&comma; अशी मागणी केली होती&period; सोसायटीत कुर्बानीमुळे इतर धर्मीयांना त्रास होऊ शकतो&comma; असा दावा पत्रात करण्यात आला होता&period; तर मीरा रोडच्या पूनम क्लस्टर सोसायटीतील कुर्बानीसाठी उभारलेल्या शेडवरून वाद निर्माण झाला होता&period; हिंदुत्ववादी संघटनांनी या घटनेविरोधात आक्रमक पवित्रा घेत सोसायटी परिसरात आंदोलन केले होते&period; आता या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपसह शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केलाय&period;<&sol;p>&NewLine;<p>संजय राऊत म्हणाले की&comma; आता महाराष्ट्रात वडापाव सोबत मत्स्य पाव येणार आहे&period; हे नवीन-नवीन फंडे काढत असतात&period; पण खिमा पाव खायचा नाही&period; कारण त्याचा संबंध मुस्लिमांशी आहे&period; काल या राज्यात मुस्लिमांच्या सणावरून दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला&period; हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभत नाही&period; तुम्ही स्वतः मटणाची दुकानं चालवतात&period; अर्ध्या मंत्र्यांची हॉटेल्स आहेत&period; मग तुम्ही तिथे आता फक्त श्रीखंड पुरीच विका&period; महाराष्ट्र हा मांसाहारी आहे&period; महाराष्ट्र हा क्षत्रिय धर्माचे पालन करणार आहे आणि तुम्ही महाराष्ट्रावर काय लादत आहात&quest; महाराष्ट्राची दिशा अत्यंत चुकीच्या पद्धतीने सुरू आहे&comma; असे त्यांनी म्हटले&period;<&sol;p>&NewLine;<p>संजय राऊत पुढे म्हणाले की&comma; यावर गृहमंत्र्यांनी आणि पोलिसांनी बसून तोडगा काढायला हवा होता&period; महाराष्ट्राचे सरकार देवळात बळी देऊनच आले आहे&period; कामाख्या देवीच्या मंदिरात 55 रेडे कापले गेले&period; ती कुर्बानीच आहे&period; त्या कुर्बानीवर देखील तुम्ही आक्षेप घ्यायला हवा&period; 55 रेडे कापून जे सरकार सत्तेत आले आहे ते सरकार दुसऱ्यांच्या कुर्बानीला विरोध करत आहेत&period; हा मानसिक गोंधळ आहे&period; महाराष्ट्रात मांसाहार होणारच आहे&period; जे मुसलमानांच्या कुर्बानीला विरोध करत आहेत ज्यांनी मंदिरात 55 रेडे कापले आणि सत्तेवर आले&period; त्यांच्यासोबत आपण बसलेला आहात&period; त्या कुर्बानीला सुद्धा विरोध केला पाहिजे&comma; असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला&period;<&sol;p>&NewLine;<p>नीट पेपरफुटी प्रकरणात तेजस शाह या विद्यार्थ्याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे&period; याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की&comma; नीट पेपरफुटीचं केंद्र हे महाराष्ट्र आहे&period; तेजस शाह यामागे आहे&period; शाह कुठे ना कुठे येतोच&period; केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची जेवढी जबाबदारी आहे&period; तेवढी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील आहे&period; जसे भाजपच्या ताब्यात निवडणूक आयोग आहे&period; इतर यंत्रणा आहेत आता तशाच स्पर्धा परीक्षाही त्यांनी ताब्यात घेतल्या आहेत&period; यावर मुख्यमंत्र्यांनी बोलावं&period; त्यांच्या लोकांना फायदा व्हावा&comma; त्यांच्या लोकांना पेपर मिळावा&comma; यासाठी हे सगळं केलंय&comma; असा आरोप त्यांनी यावेळी केला&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version