Home Latest News गाव बाल संरक्षण समिती सदस्य, सचिव व अंगणवाडी सेविका यांचे बाल कायदे...

गाव बाल संरक्षण समिती सदस्य, सचिव व अंगणवाडी सेविका यांचे बाल कायदे विषयक प्रशिक्षण संपन्न

0

<p><strong>यवतमाळ &colon;-<&sol;strong> महिला व बाल विकास विभागांतर्गत महात्मा गांधी प्रशिक्षण संस्था व महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण संस्था&comma; पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने&comma; जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय&comma; यवतमाळ आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसेच एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प&comma; दिग्रस यांच्या सहकार्याने&comma; गाव बाल संरक्षण समिती सदस्य&comma; सचिव आणि अंगणवाडी सेविका यांचे &&num;8220&semi;बालकांचे कायदे विषयक प्रशिक्षण १८ सप्टेंबर २०२५ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह&comma; गुरुदेव नगर&comma; दिग्रस येथे पार पडले&period;<&sol;p>&NewLine;<p>प्रशिक्षण कार्यक्रम विशाल जाधव&comma; जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी&comma; यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला&period; कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुल वाघ&comma; सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक&comma; हे होते&period; यावेळी अमोल गुंडे&comma; सहा&period; पोलीस उपनिरीक्षक सोनाली कनाके बाल विकास प्रकल्प अधिकारी अश्विनी धवणे पर्यवेक्षिका&comma; श्याम गोमासे&comma; संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर&comma; जिल्हा बाल संरक्षण अधिकारी हे मान्यवर उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>या प्रशिक्षणचे प्रास्ताविक देवेंद्र राजूरकर यांनी केले व प्रशिक्षण आयोजनाचा उद्देश सांगितला&comma; बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियमन २०१५&comma; बाल विवाह प्रतिबंध कायदा २००६&comma; बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ नुसार बाल संरक्षणात अंगणवाडी सेविका व गाव बाल संरक्षण समितीची भूमिका यावर उपस्थित मान्यवर यांनी व माधुरी पावडे-संरक्षण अधिकारी पीपीटी द्वारे मार्गदर्शन केले व बाल विवाह विषयी माहितीपट दाखविण्यात आले&period; यावेळी राष्ट्रीय पोषण माह बाबत प्रतिज्ञा घेण्यात व पोषण माह राबविणे बाबत उपक्रमाची माहिती देण्यात आली&period; या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कोमल नंदपटेल यांनी केले&period; प्रशिक्षणाच्या यशस्वितेकरीता हेमंत शिंदे&comma; राजकुमार डवरे यांचे विशेष सहकार्य लाभले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version