spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दहेगाव येथे वृक्षारोपण

किशोर साहू, मौदा :- पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव व गट ग्रामपंचायत दहेगाव च्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम दहेगाव येथे  बुधवार (ता. 12 ऑगस्ट) ला घेण्यात आला. या कार्यक्रमाला मौदा पंचायत समिती चे गटविकास अधिकारी महेश बहेकर,मौदा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संकेत मरसकोल्हे, गट ग्रामपंचायत दहेगाव चे सरपंच भारती संदीप आंबिलढुके, गट ग्रामपंचायत दहेगाव चे उपसरपंच रवींद्र ढोमणे,शाळा व्यवस्थापन समिती दहेगाव चे अध्यक्ष नितेश इंगळे, दहेगावातील प्रतिष्ठित नागरिक नथू आंबिलढुके, पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव चे मुख्याध्यापक वासुदेव भुते, गट ग्रामपंचायत चे ग्रामसेवक राजकुमार गजभिये, इको क्लबचे प्रमुख राजेश रोहाड ,इको क्लबचे सर्व विद्यार्थी, सर्व गट ग्रामपंचायत दहेगाव येथील कर्मचारी , गट ग्रामपंचायत दहेगाव येथील मनरेगाची काम करणारे सर्व कर्मचारी उपस्थितीत होते.

सुरुवातीला गट ग्रामपंचायत दहेगाव च्या वतीने दहेगाव ते चिखली या रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावण्यात आली. त्यानंतर पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव च्या शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला शिक्षकवृंद सुधीर खंडाईत, सुधीर कांबळे , राजेश रोहाड,प्रज्ञा रामटेके , सुजाता बोदेले , संगीता कारेमोरे , पुष्पलता उके,उमेश उके, कैलास फटिंग उपस्थित होते. आभार प्रदर्शन शिक्षक राजेश रोहाड यांनी केले.

Popular Articles