spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तरोडी येथे गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाचा माणुसकीचा हात; स्वखर्चातून बूट वाटप

किशोर साहू, मौदा :- गट ग्रामपंचायत तुमान अंतर्गत मौजा तरोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांकडे बूट नसल्याचे निदर्शनास आल्याने शाळेतील शिक्षक अभिषेक रंगारी यांनी सामाजिक बांधिलकी जपत बूट नसलेल्या गरजू विद्यार्थ्यांसाठी स्वतःच्या खर्चातून बूट खरेदी केले.

विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण घेताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, तसेच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने शिक्षक अभिषेक रंगारी यांनी स्वखर्चातून बूट उपलब्ध करून दिले. या बुटांचे विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत तुमानचे सरपंच धम्मजीत गजभिये व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अभिषेक गायकवाड यांच्या हस्ते सोमवार ( ता. 10 ऑगस्ट) ला वाटप करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. शिक्षकांनी केलेल्या या उपक्रमाचे पालक, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने कौतुक करण्यात आले.शिक्षक अभिषेक रंगारी यांच्या या उपक्रमातून ‘शिक्षक केवळ शिकवत नाही, तर विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार त्यांच्यासाठी उभाही राहतो’, हा मानवतेचा संदेश मिळाला आहे.

Popular Articles