spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

तुमसर पोलिसांची अवैध हातभट्टीवर धडक कारवाई; २ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त

हंसराज,भंडारा तुमसर :- शहरातील कचरा संकलन केंद्राच्या मागील बाजूस असलेल्या नाल्याच्या काठी सुरू असलेल्या अवैध हातभट्टीवर तुमसर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी २ लाख ६३ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना अटक केली आहे.

अंकुश मनोहर नेरकर (३९, रा. डोंगरला, ता. तुमसर) आणि अजित प्रकाश डोंगरे (२५, रा. रविदास नगर, तुमसर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तुमसर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई कांबळी यांना गुप्त माहिती मिळाली होती की, कचरा संकलन केंद्राच्या मागील नाल्याच्या दक्षिण काठावर, तुमसर शेतशिवारात अवैध हातभट्टी सुरू आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता दोन्ही आरोपी दारू गाळताना रंगेहात मिळून आले.

पोलिसांनी घटनास्थळावरून १२०० किलो सडवा मोहफूल (किंमत २,४०,०००/- रु.), ४० लिटर हातभट्टीची तयार दारू, ४ लोखंडी ड्रम, जर्मनचे मोठे व लहान घमेले, जर्मन करची, प्लॅस्टिक पाईप आणि जळाऊ लाकूड असा एकूण २ लाख ६३ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७५७/२०२४ (कलम ६५ (फ), (ब), (क), (ड), (ई) महाराष्ट्र दारूबंदी कायदा) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक बारसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई कांबळी व त्यांच्या पथकाने केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.