spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वायगाव येथे दोन दिवसीय मंडईला उद्यापासून डाकू गब्बरसिंग या नाटकाने सुरुवात 

किशोर साहू, मौदा :- दरवर्षीप्रमाणे यंदाही गट ग्रामपंचायत सिरसोली अंतर्गत येत असलेल्या वायगाव येथे उद्या मंगळवार (दि. 27 जानेवारी)पासून दोन दिवसीय मंडईची सुरुवात दुपारी तीन वाजता नऊ अंकी नाट्य डाकू गब्बरसिंग ने होणार आहे. बुधवार (दि. 28 जानेवारी) ला सकाळी दहा वाजता पासून शाहीर मोरेश्वर यांच्या खडा तमाशा तर रात्री आठ वाजता मराठी लावणी चे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्ष पाहुणे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रमुख पाहुणे राज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे ,संकेत वनवे, टेकचंद सावरकर ,योगेश देशमुख, स्वप्निल श्रावणकर, प्रसन्ना तिडके, मुकेश अग्रवाल, सदानंद निमकर, नरेश बावनकुळे, प्रशांत भुरे ,भगवान बावनकुळे, डॉ. मनोज कुमार गायधने ,खुशाल धूमनखेडे, अशोक हटवार ,विनोद कारेमोरे, जगन्नाथ गायधने, प्रमिला विलास देशमुख ,पुष्पा राजू धुर्वे, दुर्गा जीवन धूमनखेडे ,शितल रोशन हारोडे सह गावातील, परिसरातील ,तालुक्यातील, उद्योजक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून या दोन दिवसीय मंडई कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आव्हान मंडई उत्सव समितीचे अध्यक्ष तुळशीराम मारवाडे , उपाध्यक्ष शिवाभाऊ हारोडे, सचिव मनीष गायधने, कोषाध्यक्ष अंकुश शेंडे, सदस्य धनराज धुमनखेडे,आतिश हारोडे, किशोर शेंडे सह ग्रामवासीयांनी केले आहे.

Popular Articles