spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

राजेदहेगाव शिवारात अवैध हातभट्टीवर धाड; ८२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

हंसराज, प्रतिनिधी भंडारा जवाहरनगर :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जवाहरनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राजेदहेगाव शेतशिवारात सुरू असलेल्या अवैध हातभट्टीवर धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण ८२,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पो.हवा. पंचबुधे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजेदहेगाव परिसरात सापळा रचला. यावेळी आरोपी सुरज प्रभाकर नंदेश्वर (वय २९ वर्ष, रा. इंदिरा नगर, सावरी, ता. जि. भंडारा/गोंदिया) हा अवैध रित्या हातभट्टीची दारू गाळताना मिळून आला.

या छापेमारीत पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला:

४०० किलो सळवा मोहाफास (१० प्लास्टिक पन्न्यांमध्ये प्रत्येकी ४० किलो प्रमाणे) – किंमत ८०,००० रुपये., एक लोखंडी मोठा ड्रम – किंमत ५०० रुपये., ८० किलो जळाऊ लाकडे – किंमत १,६०० रुपये. असा एकूण ८२,१०० रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून हस्तगत करण्यात आला.

या प्रकरणी आरोपी सुरज नंदेश्वर याच्याविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात अप. क्र. २२/२०२६, कलम ६५ (फ) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक चिचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. पंचबुधे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जवाहरनगर पोलीस करीत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.