spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मांगली (तेली) येथे दोन दिवसीय शिवजयंती उत्सवाला बुधवारपासून झाली सुरुवात, आज भव्य रॅली व किर्तन

किशोर साहू, मौदा :- श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव कार्यक्रम अंतर्गत भगवे वादळ ग्रुप मांगली (तेली )तर्फे दोन दिवसीय शिवजयंती उत्सवाचे आयोजन ग्रामपंचायत परिसरात करण्यात आले आहे. बुधवार (ता. 18 फेब्रुवारी)ला सकाळी नऊ वाजता पासून सोमलवाडा लाखनी द्वारा संचालित अमर गायन पार्टी तुरा घराणे शाहीर अंबादास नागदेवे यांच्या अमर सांस्कृतिक लोककला निकेतन तर्फे खडीगंमत चे आयोजन करण्यात आले. आज गुरुवार (ता. 19 फेब्रुवारी)ला दुपारी चार वाजता भव्य रॅली तर सायंकाळी सात वाजता भंडारा जिल्ह्यातील मुक्काम कवडशी येथील ह भ प नीरज निवृत्तीची भंडारी महाराज यांच्या किर्तन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ,राज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे , कार्यक्रमाचे उद्घाटक मौदा नगरपंचायत नगराध्यक्ष प्रसन्ना उर्फ राजा तिडके, माजी आमदार टेकचंद सावरकर ,माजी सभापती अवंतिका लेकुरवाळे, स्वप्निल श्रावणकर, राधा मुकेश अग्रवाल ,प्रमुख अतिथी देवेंद्र गोडबोले, रामेश्वर लिचडे ,तापेश्वर वैद्य, निशा रवींद्र फटिंग, मोनू कवडू साठवणे, विक्की साठवणे, रवींद्र फटिंग, मारुती साठवणे, लंकेश डोरले, बंडू बुराडे, शीतल मेश्राम ,माया उईके, स्नेहा साठवणे, शुभम कापसे, पतिराम मेश्राम सह गावातील, परिसरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भगवे वादळ ग्रुपचे पदाधिकारी आदित्य साठवणे, आकाश वाट, गणेश मेश्राम, नंदू लांडगे ,योगेश साठवणे, देवांशू साठवणे, स्वराज साठवणे, घनश्याम मडावी, कुणाल साठवणे, राकेश साठवणे, शुभम साठवणे, समीर चव्हाण, सुदर्शन साठवणे, लोकेश साठवणे ,वजीर वैद्य, वंशील चव्हाण ,रोहित मेश्राम, गुड्डू सोनवाणे ,धनराज टेकाम, संदीप टेकाम परिश्रम घेत असून समस्त ग्रामवासी सहकार्य करीत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.