Home Latest News NEET-UG पेपरफुटी प्रकरणात आणखी दोन जण अटकेत

NEET-UG पेपरफुटी प्रकरणात आणखी दोन जण अटकेत

0

<p><strong>&&num;8211&semi; आरोपींची संख्या 13 वर&comma; यापैकी 9 जण महाराष्ट्रातले<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नाशिक &colon;-<&sol;strong> NEET-UG 2026 परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने आणखी दोन आरोपींना अटक केली आहे&period; यामुळे या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची एकूण संख्या 13 झाली असून यापैकी 9 जण महाराष्ट्रातले आहेत&period; लातूरमधील डॉ&period; मनोज शिरुरे आणि पुण्यातील कोचिंग इन्स्टिट्यूटचे शिक्षक तेजस हर्षदकुमार शाह असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत&comma; असे सीबीआयने आपल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात डॉ&period; मनोज शिरुरे या लातूर येथील डॉक्टरला अटक करण्यात आली आहे&period; एका कोचिंग सेंटरच्या मालकाचा मुलगा &lpar;जो स्वतः आरोपी आहे&rpar; याच्यासह एकूण तीन विद्यार्थ्यांना&comma; आरोपी पी&period; व्ही&period; कुलकर्णी यांच्याकडून रसायनशास्त्राचे प्रश्न मिळवून देण्यात या डॉक्टरने महत्त्वाची भूमिका बजावली होती असे सीबीआयने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे&period; अटक करण्यात आलेला दुसरा आरोपी म्हणजे तेजस हर्षदकुमार शाह&period; हा पुण्यातील &&num;8216&semi;डॉ&period; अभंग प्रभू मेडिकल ॲकॅडमी&&num;8217&semi; या कोचिंग सेंटरमध्ये भौतिकशास्त्राचा शिक्षक म्हणून कार्यरत आहे&period; त्याला NEET-UG 2026 परीक्षेचे फुटलेले भौतिकशास्त्राचे प्रश्न&comma; यापूर्वीच अटक करण्यात आलेली आरोपी मनीषा हवालदार हिच्याकडून मिळाले होते&period; या प्रकरणातील संपूर्ण साखळी आणि त्यामागील कट उघडकीस आणण्यासाठी तपास सुरू आहे&period; CBI ने आतापर्यंत विविध ठिकाणी 49 ठिकाणी झडत्या घेतल्या असून&comma; अनेक गुन्हेगारी पुरावे ठरू शकणारी कागदपत्रे&comma; लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत&period; जप्त करण्यात आलेल्या या वस्तूंचे सखोल विश्लेषण करण्याचे काम सध्या सुरू आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version