Home Latest News कत्तलीसाठी डांबलेल्या 131 गोवंशाची सुटका

कत्तलीसाठी डांबलेल्या 131 गोवंशाची सुटका

0

<p><strong>छत्रपती संभाजीनगर &colon;-<&sol;strong> कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या तब्बल १३१ गोवंशाची पोलिसांनी सुटका केली&period; शहरातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली बकरी ईदच्या पूर्वसंध्येला बुधवारी &lpar;दि&period;२७&rpar; दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान बायजीपुरा-संजयनगर भागात करण्यात आली&period; विशेष म्हणजे हे गोवंश दाटवस्तीत आणि काही घरांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर&comma; छतावर लपविण्यात आले होते&period; पोलिसांनी ८ आरोपींना ताब्यात घेतले असून&comma; चार स्वतंत्र गुन्हे दाखल केले जात आहेत&period; दरम्यान&comma; आरोपींची साखळी निष्पन्न करून टोळीवर मोक्का लावणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>&&num;8216&semi;पोलिस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार&comma; २१ मे रोजी शासनाने गोवंश हत्या आणि बेकायदेशीर मांस विक्रीसंदर्भात काढलेल्या परिपत्रकानुसार&comma; पोलिसांनी कत्तलखान्यांशी संबंधित व्यावसायिक आणि स्थानिक नागरिकांच्या बैठका घेतल्या होत्या&period; तसेच शांतता समितीच्या बैठकीत स्थानिक धर्मगुरूंनीही गोवंश हत्या न करण्याचे आवाहन केले होते&period;<&sol;p>&NewLine;<p>एवढेच नाही तर फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्सनाही याबाबत कल्पना देण्यात आली होती&period; मात्र तरीही जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही घरांमध्ये कत्तलीसाठी गोवंश लपवून ठेवल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती&period; त्यानुसार&comma; पोलिस आयुक्तालयातून मोठा फौजफाटा दुपारी २ वाजेच्या सुमारास जिन्सी भागात दाखल झाला&period; त्यांच्या मदतीला राखीव दलाच्या तुकड्या देण्यात आल्या होत्या&period; संजयनगर&comma; बायजीपुरा भागात कोम्बिंग सुरू केले&period; १० ते १२ घरांमध्येच पोलिसांना मोठ्याप्रमाणात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गायी आढळून आल्या&period; काही घरांच्या तर दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर गायी लपविण्यात आल्याचे पाहून पोलिसही अवाक झाले होते&period; सर्व गायींना जिन्सी पोलिस ठाण्यातून मनपाच्या कोंडवाडा वाहनातून गोशाळेत पाठविण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version