Home Latest News ताडोबाच्या बफर झोनमध्ये वन्यजीवांचा बळी! रेल्वेच्या भीषण धडकेत वाघाचा जागीच अंत

ताडोबाच्या बफर झोनमध्ये वन्यजीवांचा बळी! रेल्वेच्या भीषण धडकेत वाघाचा जागीच अंत

0

<p><strong>चंद्रपूर &colon;-<&sol;strong> ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासाठी ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा वन्यजीवांच्या मृत्यूची दुर्दैवी घटना समोर आली आहे&period; गोंदिया–नागभीड–बल्लारशा रेल्वेमार्गावरील सिंदेवाही–राजोली रेल्वे स्थानकादरम्यान एका वाघाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला&period; गुरुवारी सकाळी ही घटना घडली असून भरधाव मालगाडीची जोरदार धडक बसल्याने वाघ जागीच मृत्यूमुखी पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>ही घटना सिंदेवाही–राजोली रेल्वे मार्गावरील क्रमांक 1181&sol;8 परिसरात घडली&period; सकाळच्या सुमारास रेल्वे ट्रॅकवर वाघाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली&period; रेल्वे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ याची माहिती वन विभागाला दिली&period; माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा सुरू करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>प्राथमिक माहितीनुसार&comma; वाघ रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना भरधाव मालगाडी त्याच्यावर आदळली&period; धडक इतकी भीषण होती की वाघाचा घटनास्थळीच मृत्यू झाला&period; अपघातानंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते&period; वन विभागाने घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>सध्या मृत वाघाचे वय&comma; लिंग आणि तो कोणत्या वनक्षेत्रातील आहे याबाबत माहिती गोळा करण्यात येत आहे&period; शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण अधिकृतपणे स्पष्ट होणार असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले&period; तसेच संबंधित वाघाचा हालचालींचा मागोवा घेण्यासाठी परिसरातील कॅमेरा ट्रॅप आणि वन विभागाच्या नोंदी तपासल्या जात आहेत&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version