spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

वैध मापन शास्त्र कायद्याचा भंग,दोन परवानाधारकांवर कारवाईचे आदेश..

– बेकायदेशीर पैसे वसुलीप्रकरणी सहनियंत्रकांचा कडक पवित्रा

गडचिरोली / नागपूर  :- वैध मापन शास्त्र अधिनियम २००९ व वैध मापन शास्त्र (अंमलबजावणी) नियम २०११ अंतर्गत परवान्यातील अटी व शर्तींचा भंग केल्याप्रकरणी मेसर्स जनबंधू स्केल सर्विस, प्रो.अमोल रामेश्वर जनबंधू (विक्रेता परवानाधारक) तसेच मेसर्स ब्लॅक संसुई इलेक्ट्रॉनिक्स वेट, नागपूर, प्रो. अभिषेक गुम्पलवार (परवानाधारक) हे दोषी आढळून आले आहेत.

या प्रकरणी निरीक्षक, वैध मापन शास्त्र, गडचिरोली विभाग यांना संबंधित दोन्ही परवानाधारकांविरुद्ध आवश्यक ती कायदेशीर कारवाई करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. सदर आदेश सहनियंत्रक, वैध मापन शास्त्र विभाग यांनी काढले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, वरील दोन्ही परवानाधारकांनी लाड हार्डवेअर यांच्याकडून पडताळणी व मुद्रांकनाच्या कामासाठी बेकायदेशीरपणे पैसे वसूल केले. विशेष म्हणजे, ही रक्कम शासकीय कोषागारात जमा न करता स्वतःकडेच ठेवल्यामुळे शासनाची तसेच ग्राहकांची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने तक्रारदाराने दोन्ही आरोपी परवानाधारकांचे सर्व परवाने रद्द करण्यात यावेत, अशी मागणी केली असून, विभागानेही या तक्रारीची गंभीर दखल घेत कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. वैध मापन शास्त्र विभागाच्या या कारवाईमुळे अनधिकृत पैसे वसुली, नियमभंग आणि ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या परवानाधारकांमध्ये खळबळ उडाली असून, भविष्यात अशा प्रकारांवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.