Home Latest News निजामाच्या काळात रेल्वे रुळ उखडणाऱ्या रणरागिणी कोण होत्या ?

निजामाच्या काळात रेल्वे रुळ उखडणाऱ्या रणरागिणी कोण होत्या ?

0

<p><strong>रझाकारांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या रणरागिणी तथा मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई असा गौरव ज्यांचा केला जायचा त्या दगडाबाई देवराव शेळके यांचे स्मारक मात्र&comma; आश्वासन देऊनही कागदावरच राहिले&period;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>छत्रपती संभाजीनगर &colon;<&sol;strong> हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या लढ्यात रझाकारांबरोबर मराठवाड्यातील अनेकांना शस्त्र हातात घ्यावी लागली&period; यात महिलांचाही समावेश होता&period; एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हत्यार पुरवण्याचे काम महिला करत असत&period; अगदी पोलीस चौकी जाळण्यापर्यंतचेही शौर्य मराठवाड्यातील महिलांनी दाखवले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>रझाकारांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या रणरागिणी तथा मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई असा गौरव ज्यांचा केला जायचा त्या दगडाबाई देवराव शेळके यांचे स्मारक मात्र&comma; आश्वासन देऊनही कागदावरच राहिले&period; बदनापूर तालुक्यातील &lpar;जि&period; जालना&rpar; धोपटेश्वर येथे हे स्मारक उभारण्याची घोषणा २०२३ मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत केली होती&period; परंतु दोन वर्षांमध्ये ना निधी मिळाला ना स्मारकाची जागा ठरली&period;<&sol;p>&NewLine;<p>जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील कोलते टाकळी येथे जन्मलेल्या दगडाबाईंचा विवाह धोपटेश्वर येथील देवराव शेळकेंसोबत वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षाच झाला होता&period; परंतु त्या काही त्याकाळी शाळेत जात नव्हत्या&period; पण स्वभाव धाडसी&period; मुलांप्रमाणेच त्या निडरपणे वागत&period; झाडावर चढणं&comma; झाडावरून उड्या मारणे&comma; असे त्या करायच्या&period; खरं तर तेव्हा मुलींना घराबाहेर पडण्यास परवानगी नव्हती&period; परंतु दगडाबाई त्याला अपवाद होत्या&period;<&sol;p>&NewLine;<p>शेतीतही त्या काम करायच्या&period; त्यांच्या गावामध्ये हरिभाऊ नावाचे गृहस्थ होते&period; ते मुलामुलींना हैदराबाद मुक्तिसंग्रामातील युद्धाच्या कथा ऐकवायचे&period; त्या कथांचा दगडाबाईंवर खोलवर परिणाम झाला&period; त्यांना कथा एेकताना लढण्याचे स्फुरण चढायचे&period; आपणही लढायला बाहेर पडले पाहिजे&comma; असा विचार दगडाबाईंच्या मनी रुजला&period; परंतु पुढे त्यांचे लग्न झाले&period;<br &sol;>&NewLine;मोठी बातमी&excl; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या वर्षी&excl; सर्वोच्च न्यायालयाकडून मुदतवाढ<br &sol;>&NewLine;बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर येथील देवराव शेळके यांच्यासोबत दगडाबाईंचा विवाह झाला&period; परंतु पुढे पतीने दुसरे लग्न केले&period; मात्र&comma; दगडाबाई काही त्यांच्या पतीच्या दुसऱ्या लग्नावरून नाराज झाल्या नाहीत&period; उलट &OpenCurlyQuote;त्यांना संसार करण्यासाठी नवऱ्याने दुसरं लग्न केलं आणि मी देश सेवेचे काम करायला आता मोकळी झाले’ असे बाणेदार उत्तर आणि ठणकावून सांगत दगडाबाईंनी स्वत&colon;ला मुक्तिसंग्रामाच्या लढाईत पूर्णपणे झोकून दिले होते&period;<br &sol;>&NewLine;दगडाबाई या पिस्तुलासह अनेक शस्त्रे चालवायच्या&comma; हातबाॅम्ब फेकायच्या&comma; रेल्वे रुळ उखडून टाकलेला आहे&period; पोलीस चौकी जाळण्यापर्यंतचेही धाडसी काम करून त्यांनी मुक्तिसंग्रामाच्या लढ्यात शौर्य दाखवले होते&period; हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलिन झाल्यानंतर दगडाबाईंनी पुढे राजकीय मैदानही गाजवले होते&period; पंचायत समिती सदस्या&comma; जिल्हा परिषद सदस्या म्हणूनही त्यांनी सामाजिक कार्याचा ठसा उमटवला होता&period;<&sol;p>&NewLine;<p>source &colon; लोकसत्ता<&sol;p>&NewLine;

Exit mobile version