spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महिलांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श ठेवून समाज कार्य करावे – डॉ भावना चोपडे

कामठी :- ग्रामीण भागातील महिलांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ,व झाशीची राणी यांचा आदर्श ठेवून बचत गटाचे माध्यमातून शासनाच्या विविध महत्त्वकांशी योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ घेऊन स्वयंरोजगार उभारून आत्मनिर्भर होण्याचे आवाहन नागपूर येथील प्रख्यात डॉ. भावना चोपडे यांनी कवठा – म्हसाळा गट ग्रामपंचायत च्या वतीने बापूकुटी सभागृहात आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना व्यक्त केले. कवठा – म्हसाळा गट ग्रामपंचायत च्या वतीने आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमाची सुरुवात सरपंच निलेश डफरे यांचे हस्ते दीप प्रज्वलन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ,झाशीची राणी यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले यावेळी नागपूर येथील प्रख्यात डॉ भावना चोपडे, संजय गांधी निराधार योजना कामठी तालुका अध्यक्ष प्रांजल वाघ, कोराडी वीज प्रकल्पातील अभियंता स्वाती निलेश डफरे ,तरोडीच्या सरपंच आरती चिकटे ,माजी सरपंच लता बरबटकर ,पर्यवेक्षिका तेजल लच्छोरे,उपसरपंच रवींद्र कुहीटे ,ग्रामपंचायत सदस्य रेहान शहनावाज ,भाग्यश्री रांहगडाले, सुनंदा ठाकरे ,सुजाता सोनटक्के ,प्रतिमा पारधी ,संदीप मेंढे, प्रियंका मसराम उपस्थित होते सरपंच निलेश डफरे यांचे हस्ते वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे डॉ भावना भोयर चोपडे ,प्रांजल वाघ, तरोडीच्या सरपंच आरती चिकटे , कोराडी अनुवैष्नीक विद्युत केंद्रातील अभियंता स्वाती डफरे ,पर्यवेक्षिका तेजल लचोरे, माजी सरपंच लता बरबटकर याचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह ,पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला महिला दिन कार्यक्रमाच्या पर्वावर महिलांसाठी एकल नृत्य, समूह नृत्य, गीत गायन ,संगीत खुर्ची विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच निलेश डफरे यांनी केले संचालन स्वाती डफरे यांनी केले व आभार प्रदर्शन ग्राम विकास अधिकारी निळकंठ देवगडे यांनी मांनले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

Popular Articles