किशोर साहू, मौदा :- ग्रा पं भांडेवाडी येथे 8 मार्च महिला जागतिक दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र कोदामेढी येथील डॉ. समीक्षा महल्ले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. सरपंचा मंगला विष्णू देशमुख व गावकरी महिला मंडळी यांच्या उपस्थित सावित्रीबाई फुले यांचे फोटो चे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. डॉ. समीक्षा महल्ले यांनी महिलांना आरोग्य विषयी काळजी ,आपल्या मुलांना, मुलींना चांगले आरोग्य ठेवण्यास मार्गदर्शन केले . ग्रामपंचायत सरपंच यांनी महिलांचे काही प्रश्न ऐकून घेतले व मार्गदर्शन केले. या प्रसंगी भांडेवाडी, शिवाडौंली व सावंगी या तिन्ही गावातील बचत गटांच्या महिला, सीआरपी सविता उईके यांनी सर्व महिलांना एकत्रित करून महिलांच्या माध्यमातून खेळाचे कार्यक्रम आयोजित केले. यामध्ये संगीत खुर्ची, खो-खो ,नींबू चम्मच, कबड्डी यासारखे अनेक खेळा च्या स्पर्धा घेण्यात आले. स्पर्धा संपन्न होताच सर्व महिलांनी व गावकऱ्यांनी सामूहिक भोजनाचा आस्वाद घेतला.
याप्रसंगी डॉ. समीक्षा महल्ले ,सरपंचा मंगला विष्णू देशमुख,सविता उईके, निशा मंडारी ,पुष्पा मंडारी , तबस्सुम मालाधारी ,मंदात वाडीभस्मे, सिंधु पंधरे,सारिका मरस्कोल्हे, शरदा कुंभरे ,सुल्का कुंभरे ,सुमन मौहुर्ले, वंदना हुड ,ललिता हुड ,ललिता परतेती, रायंवता कोडवते सह गट ग्रा पं भांडेवाडी अंतर्गत येणाऱ्या भांडेवाडी, सावंगी, शिवाडौली येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



