किशोर साहू, मौदा :- जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्लिश स्कूल भोवरी येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.आजच्या युगात महिला सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहेत. घरातील जबाबदारी सांभाळून शैक्षणिक,वैद्यकीय, राजनैतिक तसेच कृषि क्षेत्रात त्या देत असलेले योगदान कौतुकास्पद आहे असे मत मुख्याध्यापिका पठाण तब्बसूम अयुबखान यांनी मांडले. केवळ एक दिवस नव्हे, तर वर्षभर महिलांचा सन्मान राखणे हीच काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश निरगुळकर ,उपाध्यक्ष प्रल्हाद वैद्य, ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ गिर्हेपुंजे, माता पालक अश्विनी बावणे, निकिता वैद्य, ज्योती वैद्य, रोहिणी चोपकर अंगणवाडी सेविका ज्योती वाडीभस्मे , मदतनीस सेजल बावणे ग्रामस्थ श्याम वैद्य, अर्जुन न्यायखोर, संजय न्यायखोर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. स्त्रीशक्तीचा सन्मान करण्याच्या उद्देशाने, शाळेच्या वतीने उपस्थित माता-पालक यांना सन्मान करण्यात आला आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.



