Home Latest News तलवारीच्या धाकावर १५ वर्षीय मुलीचे अपहरण, पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुटले प्राण

तलवारीच्या धाकावर १५ वर्षीय मुलीचे अपहरण, पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुटले प्राण

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर १२ &colon;<&sol;strong> गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका धक्कादायक घटनेचा पर्दाफाश झाला आहे&period; १८ वर्षीय तरुणाने मध्यरात्री घरात घुसून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे तलवारीच्या धाकावर अपहरण केले&period; मात्र पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आरोपीला अटक करण्यात आली असून मुलीची सुटका करण्यात यश आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>आरोपीचे नाव अमित मनोज सोनटक्के असे असून त्याची ओळख पीडित मुलीसोबत आधीपासून होती&period; काही काळापूर्वी दोघांमध्ये वाद झाल्यानंतर मुलीने प्रतापनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती&period; याच रागातून अमितने हे कृत्य केले&period;<&sol;p>&NewLine;<p>१० सप्टेंबर रोजी रात्री सुमारे २ वाजता आरोपी तलवार घेऊन मुलीच्या घरी पोहोचला&period; त्याने दरवाजा ठोठावला असता मुलीची ६४ वर्षीय आजीने दरवाजा उघडला&period; त्यावेळी आरोपीने आजीला तलवार दाखवून धमकावले व घरात जबरदस्ती घुसला&period; त्यानंतर झोपेत असलेल्या मुलीला उठवून तिच्याशी लग्न करण्याचा हट्ट धरला&period;<&sol;p>&NewLine;<p>मुलीने विरोध दर्शविला असता आरोपीने तिचा गळा दाबला व तलवार गळ्याला लावून ठार मारण्याची धमकी दिली&period; त्यानंतर त्याने जबरदस्तीने तिला घेऊन गेला&period; पीडितेच्या आजीच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिस ठाण्यात अपहरण&comma; घरफोडी&comma; धमकी&comma; विनयभंग तसेच पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे&period; पोलिसांनी आरोपी अमित सोनटक्केला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version