नागपूर :- भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल समता फोर्स महिला यांच्या अंतर्गत 69 व्या धम्मचक्र वर्धापन दिनानिमित्ताने रेशीम बाग चौक, सुरेशभट सभागृहात मंगळवारी, 30 सप्टेंबर रोजी, दुपारी 12 ते 3:30 वाजता या दरम्यान, संगीतमय नाट्यप्रयोगाचे आयोजन केले आहे. मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी ‘वुई द पीपल’ (धम्मक्रांती) ऐतिहासिक संगीतमय नाट्य :
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आज टिळक भवन येथे परिषदेमध्ये भीमराव फुसे यांनी कार्यक्रमा संदर्भात माहिती दिली. यावेळी शाहीर सीमाताई पाटील व संगीत दिग्दर्शक जॉली मोरे यांची उपस्थिती होती. संगीतमय नाट्य प्रयोग सादरकर्ते संगीत दिग्दर्शक व निर्माता जॉली मोरे तसेच सुप्रसिद्ध भारतीय महिला शाहीर सीमा पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक तथा राष्ट्रीय अध्यक्ष समता सैनिक दलाचे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे डॉ. भिमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाचे अतिथी पाहुणे डॉ. हरीश रावलिया, कॅप्टन प्रवीण निखाडे, आकाश लामा, भदंत विनाचार्य, ॲड. एस के भंडारे, यु जी बोराडे आणि प्रमुख अतिथी म्हणून इंजि. अरविंद गेडाम डॉ.एन.डी.पाटील, इंजि. हेमंत सुटे इंजि. मदन माटे आणि इंजि. राहुल परुळकर यांची उपस्थिती राहतील. असे भीमराव फुसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी उपस्थित शाहीर सीमा पाटील, जॉली नारायण मोरे, भंते राहुल बोधी, महाराष्ट्र संघटक भीमराव फुसे, डॉ.भीमराव जाधव, धर्मेश प्रेसेनजीत, इंजिनिअर नंदलाल मेश्राम, मनोहर तायडे, आनंद सायरे, सुभाष गणवीर, डॉ. तक्षिल वासनिक आणि इंजिनियर पद्माकर गणवीर यांची उपस्थिती होती.








