spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ग्रामपंचायत कार्यालय येसंबा येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती संयुक्तरित्या साजरी 

किशोर साहू, मौदा, ता.५:- दिनांक २ आक्टोंबर २०२५ ला ग्रामपंचायत येसंबा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन पोलिस पाटील नरेंद्र राऊत यांनी केले.तर ग्रामपंचायत कार्यालय समोरी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे पूजन उपसरपंच धनराज हारोडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकण्यात आला. तसेच गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य करिष्मा पानतावणे, कुमार गडे, गणेश बांगडे, अंगणवाडी सेविका माया चकोले, आशा वर्कर सुषमा गजभिये, मदतनीस कांता गजभिये, निधी मेश्राम, कर्मचारी संजय गजभिये, आणि बालगोपाल उपस्थित होते.

Popular Articles