– संविधान चौकातील महसूल सेवक, आशा व गटप्रवर्तक धरणे कार्यक्रमात केली अपील
– आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन
नागपूर :- (सीआयटीयू) व महसूल सेवक संघटना तर्फे ४ ऑक्टोबर रोजी संयुक्तपणे संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. महसूल सेवक संघटनेला सीआयटीयू तर्फे पाठिंबा देताना व आशा -गटप्रवर्तक यांच्या विविध मागण्यांना घेऊन मुसळधार पावसात सुद्धा सिटू चे राज्य अध्यक्ष -कॉ.डॉ.डी.एल.कराड यांनी उपस्थित राहून कंत्राटी व अस्थायी प्रकारच्या सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन सरकारच्या उद्योगपती समर्थक भ्रष्टाचारी सरकारला उलटून पाडण्याकरता एकत्रित येणे गरजेचे आहे. जेव्हा पर्यंत कामगार व शेतकरी समर्थक सरकार येणार नाही. तेव्हा पर्यंत कामगार व शेतकऱ्यांचे हिताच्या मागण्या मान्य होणार नाही. अशी अपील नागपूरच्या संविधान चौकात झालेल्या जाहीर सभेत कॉ.डॉ.कराड यांनी केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून त्यांना अभिवादन केले. त्यांनी पुढे म्हटले कि, जेव्हा पर्यंत बाबासाहेबांचे संविधान कायम आहे. तेव्हापर्यंत आम्ही आपल्या अधिकाऱ्याकरता संघर्ष करू शकतो. त्याकरता देशाचे संविधान वाचवणे गरजेचे आहे. केंद्र सरकारवर टीका करताना नवीन ४ कामगार कायदे आणून मोठ्या उद्योगपत्यांचे हित साध्य करण्याकरता कामगारावर व त्यांच्या अधिकारावर गदा आणण्याचे सरकार प्रयत्न करीत आहे. त्याकरता संपूर्ण देशात नवीन कामगार कायद्याच्या विरोधात सर्व कामगारांनी एकत्रित संघर्ष करून सरकारचे प्रयत्न हानून पाळणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकार जन सुरक्षा कायद्याच्या नावाखाली आमचे अधिकार संपुष्टात आणून शेतकरी कामगार यांच्या हिताकरिता संघर्ष करणाऱ्या नेत्यांना जेलमध्ये डांबून शेतकरी कामगारांच्या आंदोलनाला दळपण्याचा प्रयत्न करीत आहे. सी आय टी यू सतत शेतकरी व कामगार यांच्या हिताच्या रक्षणाकरता संघर्ष करीत आहे. आशा व गटप्रवर्तक तसेच महसूल सेवक यांना अल्प मोबदल्यामध्ये सरकारच्या हिताकरता त्यांच्या दडपशाहीत २४ तास राबावे लागत आहे. त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे गरजेचे असून सेवानिवृत्ती नंतर ५ लाख रुपये व १०हजार रुपये मासिक पेन्शन सरकारने द्यावी. अशी मागणी आशा व गटप्रवर्तक युनियनचे अध्यक्ष काँ. राजेंद्र साठे यांनी आपल्या संबोधनांमध्ये अपील केली. जानेवारी महिन्यापासून आशा वर्कर व गटप्रवर्तक यांचे केंद्र शासनातर्फे मानधन देण्यात आले नसून, राज्य शासन सुद्धा दर महिन्याला मानधन देण्यात कुचराई करीत आहे. नागपूरच्या के टी नगर यू पी एच सी मधील मेडिकल ऑफिसर तर्फे कित्येक वर्षापासून आशा वर्कर यांना वारंवार पातळीत करण्याच्या विरोधात त्यांची बदली करण्यात यावी याकरता वारंवार पत्र व्यवहार करून आंदोलन करून सुद्धा महानगरपालिका दुर्लक्ष करीत आहे. याचा सुद्धा आजच्या कार्यक्रमांमध्ये निषेध करण्यात आला. कार्यक्रमाला सीटू तर्फे राजेंद्र साठे, प्रीती मेश्राम, लक्ष्मी कोत्तेजवार, माया कावळे, रंजना पौनीकर, प्रमोद कावळेसह महसूल सेवक संघटनेतर्फे रवींद्र बोदेले, दीपक रेवतकर, शुभम जोगवे, मंगेश जांभुळकर, स्वराज जिलठेसह मोठ्या संख्येने आशा वर्कर व महसूल सेवक उपस्थित होते.








