spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपातर्फे महर्षि वाल्मिकी यांना विनम्र अभिवादन

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वतीने रामायणाचे रचयते महर्षि वाल्मिकी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

मनपा मुख्यालयातील महर्षि वाल्मिकी यांच्या तैलचित्राला मनपा अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपायुक्त राजेश भगत, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, अमोल तपासे यांच्यासह सर्वश्री शैलेश जांभूळकर, सुरेश शिवणकर, गजानन जाधव, अतुल महतो, अरुण तुर्केल, अतिश मेश्राम, प्रशिक ठवरे, मनोज सांगोळे, विशांत पिपरे, विशाल गडपायले, अशोक वानखेडे, विशाल मेहता उपस्थित होते.

Popular Articles