साळवा :- राष्ट्रीय किसान क्लबचे जिल्हाध्यक्ष आकाश भोयर व पीक कर्जधारक शेतकरी यांच्या वतीने मंगळवार दिनांक 07 ऑक्टोबर 2025 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वेलतूर पुढे बेमुदत अन्नत्याग उपोषणाला सुरुवात करण्यात आली. दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी हल्ला बोला आंदोलन करून पीक कर्ज धारक शेतकऱ्यांचे खाते सुरु करण्याबाबद निवेदन देण्यात आले होते 10 दिवसांत आम्ही सर्व खाते सुरु करण्याचा शब्द बँक ऑफ महाराष्ट्र च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेतकत्यांना दिला होता परंतु 15 दिवस उलटूनही शेतकऱ्यांचे खाते पूर्ववत सुरु करण्यात आले नसून त्याच विरोधात शेतकऱ्यांनी बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरु केले. शेतकऱ्यांवर नुकतेच आलेले अतिवृष्टीचे संकट, पिकमालाला न मिडणारा हमीभाव, व सततची नापीकी या सर्व गोष्टींना शेतकरी आधीच कंटाळलेला आहे, त्यात सरकार पीक कर्ज माफ करू अशी आशा शेतकऱ्यांना दाखवून त्यांच्या आशेवर पाणी सोडत आहे. बँक कर्मचारी पीक कर्ज थकीत असल्यामुडे शेतकऱ्यांचे खाते बंद करून त्वरित पीक कर्ज भरण्यास शेतकऱ्यांना धमकी वजा इशारा देत आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगावं कि मरावं. शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास बँक प्रवृत्त करीत आहे. शेतकऱ्यांच्या बायका पोरांनी दिवाळी अंधारातच साजरी करावी का? हा प्रश्न आज सर्वासामान्य जनता सरकारला करीत आहे. जो पर्यंत पीक कर्ज धारक शेतकऱ्यांचे खाते पूर्ववत सुरु होत नाही तो पर्यंत हा अन्नत्याग उपोषण संपणार नाही अशे मत यावेळी उपोषणकर्ते आकाश भोयर यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपा ओबीसि मोर्चा जिल्हाध्यक्ष सुनिल जुवार, माजी जिल्हा परिषद सदस्य धरगावे , वेलतूरचे सरपंच सुशिल रामटेके, गोन्हा येथील माजी सरपंच नत्थू पडोळे, माजी सदस्य ग्रा. पं. वेलतूर सुधीर बेले, पत्रकार उल्लास मेश्राम,संघरत्न उके, हरिदास लुटे, उपसरपंच गोन्हा सचिन लांडगे, उपसरपंच सोनेगाव जगदीश बांते,भाजपा पंचायत समिती सर्कल प्रमुख कृष्णा पडोळे, माजी ग्रा. पं. सदस्य गोन्हा रतन मस्के, तुडका येथील सरपंच धनराज सहारे, हरदोली सरपंच धनराज पडोळे, गोन्हा येथील माजी सरपंच दिगंबर पडोळे, चंद्रशेखर कुरजेकर यांनी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला.
यावेळी उपोषणकर्ते नितेश पडोळे, अतुल माने, विकास मेश्राम, अंकुश गोहणे, शेखर पडोळे, राकेश जीभकाटे, बालु पडोळे, संजय भोयर, सचिन मोरानडे, करण ढपकस, महेंद्र ढपकस, भावेश मरघडे व इतर अन्यायग्रस्त शेतकरी उपोषणावर ठाम आहेत.




