नागपूर :- संताजी समता परिषदेच्या वतीने संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त दोन दिवस कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहेत. रविवारी ७ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता स्कूटर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. स्कूटर रॅली महाजन आटा चक्की येथून सुरुवात करण्यात आली होती. प्रारंभी शिरोमणी संताजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मान्यवरांनी संताजींना वंदन करून अभिवादन केले. याप्रसंगी जवाहर विद्यार्थी गृहाचे अध्यक्ष शेखर सावरबांधे तसेच रक्षक मार्टचे गुरुदेव रक्षक, एड. मोहन वाडीभस्मे, किशोर चन्ने, रितेश गावंडे, रमेश भंडारी यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. ठरलेल्या मार्गावरून सुरुवात झाली मनीषनगर, नरेंद्र नगर, सोमलवाडा, गांगुली लेआउट, राजीवनगर, सीता नगर, येथून जवळ कॉलेजच्या मागे मैदानात रॅलीचे समापन झाले. या कार्यक्रमात किशोर चन्ने यांच्या अध्यक्षतेत रॅलीची सांगता झाली.

प्रस्ताविक संदीप बुटले तर संचालन नीलिमा वाघमारे यांनी केले. याप्रसंगी मंचावर निखिल भुते, काळबांडे, अजय हिंगे गजानन चकोले व अर्चना वांदिले होते. संताजी रॅलीमध्ये दीडशे ते दोनशे नागरिकांनी सहभाग दर्शविला. महाप्रसादा नंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवीदास चरडे, रमेश बारई, दिगंबर भलमे, अविनाश देवगडे, सुनील दांडेकर, अजय गोल्हर, उमेश बालपांडे, श्यामजी वैद्य, विजय हटवार, रमेश रोकडे, दीपक भोळे, मुरलीधर जयपुरकर, रवी रागीट, समर्थ रागीट, दिलीप गजानन दांडेकर, पवन बालपांडे, प्रवीण आंबटकर, नरेंद्र हटवार, गिरीजी पिसे, दीपक सांबारे, सुरेश बारई, अभिषेक आंबीलडूके, प्रमोद सावरकर, राजेश उमाटे, दिनेश येवले, संजय देशमुख, एड. प्रभाकर वाघमारे, प्रमोद महाजन, विलास बुटले वैशाली सांबारे, स्वाती लंजेवार, नलिनी वंजारी, वंदना लांजेवार, आदी समाज बांधव रॅलीत सहभागी झाले होते.




