Related Posts

गहूहीवरा रेल्वे पुलीयावर अवजड वाहतूक बंदी; ग्रामीण पोलिसांचे आवाहन

<p><strong>कन्हान &colon;-<&sol;strong> कन्हान अंतर्गत येत असलेल्या तारसा रोडवरील गहुहिवरा चौकात महारेल कडून सन २०२३ साली रेल्वे रूळावर पुलाचे बांधकाम करण्यात आले होते&period; सदर पुलावर ३५ ते ४० टन पर्यंत जड़ वाहतुक होवू शकते असे सांगण्यात आले होते&period; सदर जड वाहनाकरिता पर्यायी रोड असतांना देखील टोल चुकविण्याच्या उद्देशाने ५० ते ६० टन पर्यंतची अवजड वाहने वाहतुक होत आहे&period; त्यामुळे पुलावर दोन बाजुमध्ये मधोमध ५ ते ६ इंच पर्यंत अंतर पडले आहे&period; यापुढे अशाच प्रकारे जडवाहतुक होत राहली तर पुलाचे नुकसान होवून पुलाचे दोन्ही बाजुला असलेल्या लोकांच्या रहत्या वसत्यांवर पुल कोसळून जिवितहानी व मालमत्ता हानी होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो&period; याकरीता दिनांक ११&sol;११&sol;२०२५ रोजी पारीत झालेल्या मा&period; श्री हर्ष ए&period; पोहार&comma; पोलीस अधीक्षक&comma; नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या आदेशान्वये १२&sol;११&sol;२०२५ ते दिनांक ११&sol;०२&sol;२०२६ रोजी पर्यंत नमुद मार्गावरील अवजड वाहतुक वळविण्यात आली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>संतोष गायकवाड&comma; उपविभागिय पोलीस अधिकारी&comma; कन्हान आणि पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवघरे&comma; प्रभारी अधिकारी&comma; पोलीस स्टेशन कन्हान यांनी यासंबंधाने पोलीस स्टेशन कन्हान अंतर्गत येणारे सर्व ट्रान्सपोर्ट चालवीणारे मालक&sol;चालक यांची वारंवार बैठक घेवुन सर्व ट्रान्सपोर्ट चालवीणारे मालक चालक यांना सूचना देण्यात आले की&comma; कन्हान तारसा रोडवरील गहूहीवरा रेल्वे पुलीया यावरून अवडज वाहतूकीस बंदी असुन नमूद रोडने अवजड वाहतूक करू नका&period; तसेच लेखी पत्राद्वारे सुध्दा सर्व ट्रान्सपोर्ट चालवीणारे मालक&sol;चालक यांना माहीती देण्यात आली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>नागपुर ग्रामीण पोलीसांतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की गहूहीवरा रेल्वे पुलीया यावरून अवडज वाहतूकीस बंदी असल्याचे आदेशाचे काटेकोर पणे पालन करावे जेणेकरून अपघातास आळा बसेल&period;<&sol;p>&NewLine;