Related Posts

दुर्दैवी! थ्रेशर मशीनमध्ये अडकून ट्रॅक्टर चालकाच्या मृत्यू

<p><strong>सचिन चौरसिया&comma;प्रतिनिधी à¤°à¤¾à¤®à¤Ÿà¥‡à¤• &colon;-<&sol;strong> रामटेकजवळील डोंगरी येथे धान काढणीच्या कामादरम्यान थ्रेशर मशीनमध्ये अडकून मशीन चालकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवार &lpar;दि&period;८&rpar; डिसेंबरला दुपारी घडली&period; मंगेश चौधरी &lpar;वय ३५&comma; रा&period; महाराजपूर&rpar; असे मृताचे नाव आहे&period; शेतकरी श्रावण ठाकरे यांच्या शेतात धान काढणीचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली&period; मंगेश चौधरी हे व्यवसायाने ट्रॅक्टर चालक असून&comma; थ्रेशर मशीन चालविण्याचे कामही ते करीत होते&period; कामादरम्यान मशीनमधून निघणाऱ्या धानात तनस मिसळत असल्याचे त्यांच्या लक्षात आले&period; त्यासाठी त्यांनी मशीन बंद करून ऍडजस्ट करण्यास सुरुवात केली&period;<&sol;p>&NewLine;<p>परंतु मशीन बंद केल्यानंतरही काही सेकंद पाते फिरत असतात&period; हीच वेळ धोकादायक ठरली&period; मंगेश ऍडजस्ट करत असताना ते धान टाकण्याच्या जागेतून मशीनमध्ये पडले&period; पाय मशीनमध्ये अडकताच त्यांचे शरीर आत ओढले गेले आणि त्यांना गंभीर जखमा झाल्या&period; पाहताच पाहता त्यांचा जागीच मृत्यू झाला&period; घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला&period; मृतदेह उपजिल्हा रुग्णालय&comma; रामटेक येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला&period; या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे&period;<&sol;p>&NewLine;